अनेक युवकांना स्वता:चा व्यवसाय सुरु करायचा असतो. पण भांडवल आणि योग्य मार्गदर्शन नसल्याने युवक व्यवसायात अपयशी होत असतात. परंतु आज आम्ही आपल्याला व्यवसायाविषयी जबरदस्त आयडिया देणार आहोत. या लेखातून आपल्याला व्यवसाय कोणता सुरू करायचा याची कल्पना येईल. या लेखात आपल्याला कंपनी Franchise Business Ideas यातून आपण लाखो रुपयांची कमाई करू शकतो. याआधी Franchise Business काय असते याची माहिती घेऊ .
कोणत्यातरी कंपनीच्या ब्रँडचे नाव वापरून ती कंपनीची शाखा आपल्या शहरात सुरू करू शकतो. त्याला फ्रेंचाईजी Franchise म्हटले जाते. यासाठी कंपनीबरोबर आपल्याला करार करावा लागतो, करारासाठी आपल्याला काही शुल्क भरावे लागते. हे शुल्क प्रत्येक कंपनी वेगवेगळे असते. त्यानंतर कंपनी आपल्या नावाची फ्रेंचाईजी सुरू करते. त्यानंतर आपण कंपनी ब्रँड आणि व्यापाराची पद्धत आणि त्याद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या किंमतीने आपल्या व्यवसाय सुरू करु शकतात.
दरम्यान आपण कोणत्या भागात फेंचाईजी सुरु करणार आहात यावर आपली गुंतवणूक ठरत असते. आपण कमी बजेटमधील फ्रेंचाईजी घेऊनही आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
हेल्थ आणि फिटनेस ( Health & Fitness )
तुम्ही आपल्या शहरात कोणत्या चांगल्या मेडिकल कंपनीच्या नावाने फार्मसी Pharmacy, Clinic क्लिनिक, किंवा Gym जीमची फ्रेचाईजी सुरू शकतात.
फुड सेंटर (Food Center)
यात कॉफी शॉप, रेस्टॉरंटची फ्रेंचाईजी येते. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयाच्या परिसरात आपण फूड सेंटरची फ्रेंचाईजी घेऊ शकतात. या परिसरात आपण फूड सेंटर सुरू केल्यास आपला व्यवासय चांगल्या पद्धतीने चालू शकेल. आपण आईसक्रिमचा व्यवसाय ही करू शकतात. जर आपल्याला रेस्टॉरंट सुरू करायाच असेल तर रेस्टॉरंटही चालू करु शकतात. सध्या हा व्यवसाय खूप चर्चेत असून अधिक कमाई देणारा व्यवसाय आहे. यासाठी आपल्याला जर हात मोकळा करावा लागेल, कारण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधरण १० लाख रुपयांचे भांडवल लागेल.
गारमेंट आणि फुट वेअरचा व्यवसाय
Garment and footwear business
कपड्याचे मार्केटही खूप बदलणारे असून यात जबरदस्त पैसा आहे. विशेष करुन महिलांची फॅशन कपड्यांमध्ये अधिक रुची असते. यामुळे जर आपण प्रसिद्ध ब्रँडची फ्रेंचाईजी घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
एज्युकेशन - (Education)
शाळा, कोचिंग सेंटर, प्रशिक्षण सेंटर यामध्ये सेक्टर फ्रेंचाईजी घेऊ शकतात. शाळेच्या विद्यार्थीपासून ते इंजिनिअर, मेडिकल किंवा मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचील फ्रेंचाईजी आपण घेऊ शकतात. यात कॉम्प्युटर प्रशिक्षण, हॅण्डीक्रॉफ्ट, दुरुस्तीची फ्रेंचाईजी घेऊ शकतात.
(Vehicle Training Centre) वाहन प्रशिक्षण केंद्र - ज्या उमेदवारांना गाडी चालवणे शिकायचे आहे, ते या केंद्रामार्फत वाहन चालू शकतात. यातून आपण कमाई मार्ग तयार करु शकतात.
Published on: 14 August 2020, 02:46 IST