News

परभणी जिल्ह्यासहच पूर्णा तालुका परिसरात गेल्या दोन महिन्यापासून पशूधने जनावरील लंपीस्किन डिसीज (त्वचेवर येणाऱ्या कठीण गाठी) या कोरोनासारख्या विषाणूजन्य संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक शेतक-याची गोरा बैल, गाय,वासरे ही जनावरे लंपीच्या आजाराने मृत्युमुखी पडताहेत.

Updated on 13 June, 2023 12:36 PM IST

परभणी जिल्ह्यासहच पूर्णा तालुका परिसरात गेल्या दोन महिन्यापासून पशूधने जनावरील लंपीस्किन डिसीज (त्वचेवर येणाऱ्या कठीण गाठी) या कोरोनासारख्या विषाणूजन्य संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक शेतक-याची गोरा बैल, गाय,वासरे ही जनावरे लंपीच्या आजाराने मृत्युमुखी पडताहेत.

तरीही शासनाच्या पशुसंवर्धन खात्याचे पशूधन विकास अधिकारी तथा डाॅक्टरांचे याकडे साफ दुर्लक्ष दिसून येतेय. पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर लंपीस्किन झालेल्या भागातील जनावरांना औषध उपचार करण्यासाठी जातच नाहीत.नाईलाजाने शेतक-यांना खासगी एल एल एस पशूधन लोकांकडून स्वखर्चाने उपचार करुन घ्यावा लागतोय.

त्यांना पशूधन विकास अधिका-या ईतकी प्रॅक्टीस माहिती नसल्याने सखोल उपचार होत नसल्यामुळे जनावरे दगावताहेत. आजच पांगरा येथील शेतकरी गोविंद दत्तराव ढोणे यांचा मोठा बैल लंपीमुळे दगावला आहे. याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

उंदरापासून पिकांचा बचाव करण्याचे पर्यावरणपूरक तंत्र, शेतकऱ्यांनो जाणून घ्या...

यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात यामुळे हा रोग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, माणसांबरोबरच जनावरांमध्येही (animal) साथीचे रोग (Epidemic diseases पसरत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी जसा कोरोनाने देशात धुमाकूळ घातला होता तसाच एक रोग जनावरांमध्येही पसरत आहे.

शेतकऱ्यांनो अशा प्रकारे करा सीताफळ बहराची तयारी

त्यामुळे पशुपालकांनी (Cattle breeder) काळजी घेण्याची गरज आहे. कारण हा रोग अजूनही सर्व राज्यांमध्ये पसरला नसला तरीही काही राज्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हजारो गायींचा मृत्यू (Thousands of cows died) झाला आहे. गायींच्या शरीरात गाठी तयार होत आहेत. त्याला ताप आहे. हा ताप आणि गाठी त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहेत.
प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील परभणी.

आता शुगर फ्री तांदूळ विकसित होणार, शास्त्रज्ञांचे काम सुरू
बांग्लादेशकडून संत्रा आयात शुल्कात २५ रुपयांची वाढ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गायींच्या या तीन जाती संभाळल्यास करोडपती व्हाल,रोज देऊ शकतात 50 लिटरहून अधिक दूध

English Summary: Many animals died Pangra Lumpy disease, lack attention of doctors of Government
Published on: 13 June 2023, 12:32 IST