News

भारतीय हवामान विभागानुसार (Indian Meteorological Department) येत्या काही दिवसात राज्यात मान्सून (Mansoon) हजेरी लावणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमवेतच (Farmers) सामान्य जनतेमध्ये मोठे समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे.

Updated on 23 May, 2022 12:09 PM IST

भारतीय हवामान विभागानुसार (Indian Meteorological Department) येत्या काही दिवसात राज्यात मान्सून (Mansoon) हजेरी लावणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमवेतच (Farmers) सामान्य जनतेमध्ये मोठे समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे.

या वर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याने शेतकरी बांधवांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत. या दरम्यान राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाची (Pre-Mansoon Rain) दमदार हजेरी देखील बघायला मिळत आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त जनतेस तूर्तास आराम मिळाला आहे. निश्चितच मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील वातावरण आल्हादायक बनले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा सऱ्या यावेळी बघायला मिळाल्या.

Pm Kisan Yojana: पीएम किसानच्या वेबसाईटवर आली 'ही' महत्वाची माहिती; माहितीत नेमकं दडलंय काय?

या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने सर्व काही प्रफुल्लीत झाल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे तापमानात कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. शिवाय राज्यातील विशेषता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात गारवा बघायला मिळत आहे.

सामान्य जनता या आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहेत. आज देखील भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे तापमानात अजूनच घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. कोकणात आज तुरळक ठिकाणी पावसाच्या सऱ्या बरसणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.

Business Idea: 5 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय; मालक बना आणि कमवा लाखों; वाचा याविषयी

मान्सून लवकरच धडकणार

मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे. 27 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यास मान्सून हा पाच जूनपर्यंत तळकोकण गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मान्सून राज्यात सर्वप्रथम तळकोकणातचं दाखल होतो यामुळे राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी मान्सूनची खरी सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या विदर्भातील नागपूरच्या शाखेने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील वातावरण नीरभ्र राहणार असून हवामान कोरडे राहणार आहे.

खरं काय! चंद्रावर शेती करता येणार; चंद्रावरून आणलेल्या मातीत बहरलं रोपटं; वाचा याविषयी

राज्यात 'या' ठिकाणी आज पाऊस बरसणार

मित्रांनो भारतीय हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार, आज दिल्ली-NCR आणि आजूबाजूच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. दिल्ली व आजुबाजूच्या परिसरात ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागांमध्ये धुळीचे वादळ, गडगडाटासह गारांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने ट्विटरवर स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात देखील आज हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. आपल्या राज्यातील कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय आपल्या शेजारील राज्य गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहे.

शिवाय रायलसीमा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता यावेळी हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. निश्चितच मान्सूनपूर्व पावसाने देशात काही भागात तूर्तास तरी उकाड्यापासून आराम दिला आहे. आज कोकणात तसेच दक्षिण मध्ये महाराष्ट्रात बरसणाऱ्या पावसामुळे सामान्य जनतेस उन्हाच्या तडाख्यापासून आराम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Urad Farming: अशी करा उडीद लागवड; अन मिळवा दर्जेदार उत्पादन; वाचा याविषयी

English Summary: Mansoon Update: Arrival of pre-monsoon rains in the state; It will rain today in 'Ya' area
Published on: 23 May 2022, 12:09 IST