सध्या देशातील शेतकरी बांधव आतुरतेने मान्सूनची वाट बघत आहेत. कडाक्याच्या उन्हापासून मुक्ती मिळवण्यासाठी सामान्य नागरिक देखील मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय हवामान विभागाने नुकताच मान्सूनच्या आगमनाचा आपला अंदाज सार्वजनिक केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, या वर्षी मान्सून हा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून बळीराजा खरिपाची तयारी मोठ्या जोरात करत आहे. पुणे वेधशाळेने देखील मान्सूनबाबत आपला अंदाज नुकताच सार्वजनिक केला आहे. मित्रांनो खरं पाहता सध्या संपूर्ण देशात उकाड्याने जनता हैराण झाली आहे.
आपल्या राज्यातील विदर्भात प्रामुख्याने उष्णतेच्या लाटेमुळे जनतेस मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या अशा परिस्थितीत मान्सूनची दस्तक अंदमानात झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगितले गेले असल्याने शेतकरी बांधव समवेतच सामान्य जनता मोठी आनंदि असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून 27 मे च्या सुमारास पदार्पण करणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, केरळमध्ये मान्सूनचा येणं हे महाराष्ट्रातील मान्सूनच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते. यावर्षी केरळमध्ये मान्सून हा नेहमीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने महाराष्ट्रातही या वर्षी मान्सून लवकर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या या अंदाजामुळे पुणे वेधशाळेने देखील महाराष्ट्रात मान्सून लवकर धडकणार असल्याचे स्पष्ट केले आहे.मित्रांनो मध्यंतरी बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ बघायला मिळाले होते. यामुळे मान्सून साठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे सांगितले जातं आहे.
या असनी चक्रीवादळामुळेचं यावर्षी मान्सूनचे महाराष्ट्रात लवकरच आगमन होणार आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 3 ते चार दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण इत्यादी ठिकाणी मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे.
यामुळे आगामी काही दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. असे असले तरी विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Published on: 25 May 2022, 03:45 IST