नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा प्रकल्पाचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असून या वर्षी येणाऱ्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पाणी उपलब्ध होणार आहे.
येणाऱ्या भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राचे तहान भागवण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
दिंडोरी येथील मांजरपाडा प्रकल्पाच्या कामाची पाहणी शुक्रवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळेस बरेच मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. मांजरपाडा प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. दायित्व वाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य धरणाच्या अपूर्ण काम सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे काम 80 टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून मी 2021 अखेर पर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे.
या धरणाची उंची ही 90 मीटर आहे. काम सुरू झाल्यापासून 15 मीटर उंचीचे धरणाचे बांधकाम झाले आहे झाले असून आता केवळ 14 मीटर धरणाचे बांधकाम शिल्लक राहिले आहे. तसेच 80 टक्के धरणाचे माती काम हे पूर्ण झाले आहे.
मुख्य धरणाच्या सांडव्या ची परभणी सुरू असून भरणी सुरू असून हे काम 15 मेपर्यंत करण्याचे नियोजन असल्याने जलद गतीने काम करण्यात येत आहे.
Published on: 06 April 2021, 03:57 IST