गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अगदी हातातोंडाला आलेला घास निसर्गाने त्यांच्या तोंडातून काढून घेतला आहे. कोकणची अर्थव्यवस्था ज्या हापूस आंब्यावर अवलंबून आहे या हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. याचा थेट परिणाम आता आंबा बाजारपेठेवर होणार आहे. यामुळे कोकणचा हापूस आता महागण्याची शक्यता आहे. नुकताच सिंधुदुर्गमधील देवगडच्या किनारपट्टी भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला.
हा परिसर आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे जगप्रसिद्ध आहेत. मात्र निसर्गापुढे आता हा शेतकरी हतबल झाला आहे. तसेच आंब्यावर केलेल्या औषध फवारण्या वाया गेल्या आहेत. परिणामी खर्च वाढला आहे. आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. यामुळे आता उत्पनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे आता हापूसचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे आता येथील शेतकऱ्यांवर कर्ज काडून कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आंबा पिकावर अनेक घटक अवलंबून असतात. त्यातून अनेक उत्पादने बनवणारे कारखाने चालतात. रोजगार निर्मिती होते. मात्र आंबा पीक संकटात आल्याने त्यावर अवलंबून असलेले घटक अडचणीत सापडण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे. यातच हा आंबा आवडीने खाणारा वर्ग देखील मोठ्या आहे. या आंब्याची अनेकजण वाट बघत असतात. जर याचे दर वाढलेच तर अनेकांना तो विकत घेणे परवडणार नाही.
कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी कुठे दाखल झाली तर त्याला विकत घेण्यासाठी अनेकांची तुंबळ गर्दी होत असते. अनेकजण हा हापूस आंबा आपल्या आवाक्यात येण्याची वाट बघत असतात. आता मात्र याचे दर वाढण्याची शक्यता आहे. आता पुढील काही काळात याचे दर समजणार आहेत. आता राहिलेला मोहोर टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. यासाठी मोठा खर्च शेतकरी करत आहेत.
Published on: 12 January 2022, 06:18 IST