News

नागपूर- अनेकांना शेती न परवडणारी वाटते यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुण मंडळी दिवसेंदिवस शेतीपासून दूर जाताना दिसत आहेत. कुणी दुसऱ्या व्यवसायाकडे वळत आहेत. परंतु, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी फळशेती, भाजीपाला शेती किंवा इतर नावीन्यपूर्ण पिकांचे उत्पादन घेण्यावर भर दिला तसेच ध्येय गाठण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पिकांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर ठरते.

Updated on 28 August, 2021 5:10 PM IST

अनेकांना शेती न परवडणारी वाटते यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुण मंडळी दिवसेंदिवस शेतीपासून दूर जाताना दिसत आहेत. कुणी दुसऱ्या व्यवसायाकडे वळत आहेत. परंतु, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी फळशेती, भाजीपाला शेती किंवा इतर नावीन्यपूर्ण पिकांचे उत्पादन घेण्यावर भर दिला तसेच ध्येय गाठण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पिकांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर ठरते. याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे, खापा नरसाळा येथील विकास शालीकराम गायधने या शेतकऱ्यांने. या शेतकऱ्याने फळशेती आणि भाजीपाला शेती करुन प्रगती साधली आहे.

घरी वडिलोपार्जित दहा एकर शेती. यापैकी पाच एकरात आजोबा गणपतराव गायधने यांनी लावलेली सहाशे संत्रा झाडे. उर्वरित पाच एकरात पारंपरिक पद्धतीची शेती. विकास यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. आजोबांचा वसा पुढे चालू ठेवण्याचा निश्चय मनाशी बाळगून शालेय जीवनापासूनच आजोबांच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली. यातून शेतीची आवड निर्माण झाल्याने त्याने शिक्षणानंतर नोकरी किंवा इतर व्यवसायाचा विचार न करता शेतीमध्येच विशेष लक्ष देऊन परिश्रम घ्यायचे ठरविले.

हेही वाचा : शेतकऱ्यांन शेतीत अनोखे प्रयोग करून कमवले लाखो रुपये

कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून बागायती शेतीवर भर दिला. यासाठी कृषी मार्गदर्शन, मेळावे, कार्यशाळा व बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतीला आवर्जून भेटी दिल्यात. यातून शेतीविषयक धडे गिरवून बागायती शेतीवर भर दिला. तीन वर्षांपासून आधुनिक शेतीची कास धरली. त्यांच्याकडे असलेल्या वडिलोपार्जित 10 एकर शेतीपैकी पाच एकरात आजोबांनी लावलेल्या सहाशे संत्रा झाडांचे योग्य व्यवस्थापन ठेवून उर्वरित पाच एकरात पारंपरिक शेतीऐवजी तीन एकरात नव्याने तीनशे संत्रा झाडांची लागवड केली. यात आंतरपीक म्हणून ते भाजीपाला लागवड करीत आहेत.

 

दोन एकर जागेत ते कपाशी व तूर पीक घेत आहेत. पुढे सीताफळांची ३०० झाडे लागवड करण्याचे विकासचे नियोजन आहे. येथील कृषी साहाय्यक हर्षल घोडमारे यांच्या मार्गदर्शनाचा वेळोवेळी लाभ घेऊन बागायती शेतीत प्रगती साधली आहे. विकासने स्वतःचा विकास साधून परिसरातील इतर युवकांनाही शेतीकडे वळण्याचा सल्ला देत आहे. त्यांच्या या लाभदायक बागायती शेतीच्या उपक्रमामुळे ते परिसरातील युवा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

विकास गायधने खापा नरसाळा गावातील उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी म्हणून चर्चेत आहेत. जुन्या संत्रा झाडांच्या योग्य व्यवस्थापनामुळे यंदाचा आंबिया बार चांगलाच बहरला आहे.

English Summary: mangment is important for success in farming
Published on: 28 August 2021, 05:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)