महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे गाव देशातील सर्वात पहिले मधाचे गाव म्हणून जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. यासाठीची पूर्व तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या गावाला भेट देऊन या गावात असणाऱ्यां मध उद्योगाची पाहणी केली.
या गोळी माघर गावच्या मधपालन करणार्या शेतकर्यांशीव ग्रामस्थांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.
मांघर गावचे वैशिष्ट्य
हे गाव एक आदर्श गाव असून या गावाने आतापर्यंत तंटामुक्ती गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, एक गाव एक गणपती पुरस्कार व लोक ग्राम पुरस्कार सारखे भरपूर पुरस्कार मिळवले आहेत.आता या गावाच्या शिरपेचात मध्ये एक मानाचा तुरा रोवला जाणार असून हे गाव लवकरच देशातील पहिले मधाचे गाव ठरणार आहे.
या गावांमध्ये प्रामुख्याने घरटी मधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जर या गावाचा विचार केला तर या गावात घराघरात मधपाळ आहेत. जिल्ह्यातील एकूण मध उत्पादनाचा विचार केला तर दहा टक्के उत्पादन या गावातून होते. जिल्हाधिकार्यांनी या गावाला भेट देऊन राजेंद्र चोरगे या मधपाळाच्या घरी भेट देऊन मधपालांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की,पर्यटनाची संकल्पना आता बदलली आहे. शहरात मिळते ते पाहण्यासाठी येथे कोण येणार नाही त्यांना काहीतरी वेगळे हवे आहे.
लोकांना आता नैसर्गिक आणि पारंपारिक गोष्टी पाहण्याची जास्त आवड आहे त्यामुळे तुम्ही ते द्या व निसर्गाला हात न लावता पर्यावरणाशी तडजोड करू नका जंगलाचे जतन करा आणि संवर्धन करा असे ते म्हणाले.(स्त्रोत-सकाळ)
Published on: 27 February 2022, 01:49 IST