आपल्याकडे हापूस आंबा म्हटले सगळ्यात अगोदर येतो नजरेसमोर येतो तो कोकणचा आंबा.परंतु वाशीमार्केटमध्ये आफ्रिकन मलावी आंब्याचीपहिली खेप दाखल झाली आहे.दरवर्षीचा विचार केला तर कोकणातून एपीएमसी बाजारात व देशाच्या इतर भागात कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी येत असतो.
.तसेच भारता सोबतच परदेशात देखील हापूस आंबा निर्यात केला जातो.परंतु आपला भारतीय हापूस आंबा अजून बाजारात दाखल व्हायला तीन ते चार महिन्यांचा कालावधी बाकी आहे.याच दरम्यानएपीएमसी बाजारात आफ्रिकन आंब्याची आवक झालीआहे.
या आफ्रिकन मलावी आंब्याचे उत्पादन हे आफ्रिकेतील मलावी देशात काढले जाते. आपल्याकडील कोकण हापुस आंब्या सारखेया मलावी आंब्याची चव,रंग आणि सुगंध असतो.
मलावी जवळजवळ 600 हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे.दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी मधून 40000 हापुस आंब्या च्या काड्या मलावी मध्ये नेल्या होत्या. हापूस आंब्याला पोषक असलेले कोकणातील हवामान सारखेच मलावी मधील हवामान देखीलउष्ण व दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली झाली आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले आहे.याचाच परिणाम म्हणून या आफ्रिकन हापूसची एपीएमसी मार्केटमध्ये तीन ते चार महिने आवक सुरू राहणार आहे. या आंब्याची किंमत 1200 ते 1500 प्रती बॉक्स अशी आहे. शुक्रवारी आलेल्या पहिल्या खेपेत या आंब्याच्या 270 पेट्या बाजारात दाखल झाल्या.
Published on: 13 November 2021, 08:06 IST