News

तसेच शेतकऱ्यांच्या योजनांचा निधी /अनुदान बँकांनी पीक कर्जात कापू नये. जिल्ह्यात चोर बीटीची वाहतूक, विक्री, साठवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी पथके तयार करून गस्त घालावी. गाव स्तरावरील कृषी यंत्रणेने प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

Updated on 12 May, 2025 2:53 PM IST

चंद्रपूर : खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतोया हंगामावरच शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह होतोत्यामुळे जिल्ह्यात खतेबियाणे यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी अतिशय सूक्ष्म नियोजन करावेअशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी केल्या.

नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होतेयावेळी आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवारकीर्तीकुमार भांगडियाकरण देवतळेदेवराव भोंगळेजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंगअतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधूजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारआत्माचे संचालक अरुण कुसळकर आदी उपस्थित होते.

खतेलिंकिंग संदर्भात जिल्ह्यात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेतअसे सांगून पालकमंत्री डॉउईके म्हणालेलिकिंग संदर्भात लवकरच आढावा बैठक घेण्यात येईलहा विषय राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत सुद्धा मांडण्यात येईलशेतकऱ्यांना बँकांनी त्वरित पीककर्ज उपलब्ध करून द्यावेशेतकऱ्यांची अडवणूक करू नयेतसेच शेतकऱ्यांच्या योजनांचा निधी /अनुदान बँकांनी पीक कर्जात कापू नयेजिल्ह्यात चोर बीटीची वाहतूकविक्रीसाठवणूक होणार नाहीयाची काळजी घ्यावीत्यासाठी पथके तयार करून गस्त घालावीगाव स्तरावरील कृषी यंत्रणेने प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावेजिल्ह्याच्या कृषी विषयक बाबींची माहिती राज्यस्तरीय बैठकीत मांडण्यात येईलअसेही डॉउईके यांनी सांगितले.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणालेचंद्रपूर हा धानाचा जिल्हा आहेएक जिल्हा एक उत्पादन या अंतर्गत चंद्रपूरमध्ये ध्यान अधोरेखित झाले आहेराज्य सरकारने धरणाचे उत्पादन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी चंद्रपूर जिल्ह्याला दरवर्षी 20 कोटी रुपये द्यावेशेततळ्याचे अनुदान 75 हजार रुपयावरून 90 हजार रुपये करावेरोजगार हमी योजनेचे प्रलंबित 45 कोटी रुपये ताबडतोब जिल्ह्याला मिळावेतसेच शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याचे धोरण ठरवावेअशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केलीयावेळी इतरही आमदारांनी सूचना केल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 52 हजार 729 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहेयात सर्वसाधारण खरीप क्षेत्र 4 लक्ष 58 हजार 729 तर सर्वसाधारण रब्बी क्षेत्र 88,245 आहेजिल्ह्यात भातसोयाबीनकापूसतूरज्वारी ही महत्त्वाची पिके असून सन 2025- 26 करिता एकूण 4 लक्ष 75 हजार हेक्टरवर खरीप लागवडीचे नियोजन करण्यात आले आहेखरीप हंगाम 2025 साठी जिल्ह्यात 64583 क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहेतसेच खरीप हंगामाकरीता 1 लक्ष 67 हजार 178 मेट्रीक टन रासायनिक खतांचे वावंटन प्राप्त झाले आहेयावर्षी 1250 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे नियोजन आहेअसे बैठकीत सांगण्यात आले.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते शेतीविषयक योजनांच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आलेहरीतक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे सुरूवात झालीकार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केलेबैठकीला कृषी विभागाचे अधिकारीबँकेचे अधिकारीकृषी केंद्र संचालक आदी उपस्थित होते.

English Summary: Make detailed planning for farmers during the Kharif season Guardian Minister Dr. Ashok Uike
Published on: 12 May 2025, 02:53 IST