आधार कार्ड महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया द्वारे लागू करण्यात आलेल्या आधार कार्डमध्ये व्यक्तीच्या अनेक खाजगी माहिती साठवलेल्या असतात. बऱ्याच काही दिवसांपासून आधार नंबर द्वारे फसवणुकीच्या तक्रारी समोर येत आहेत. आधार कार्ड नंबर द्वारे कोणीही तुमची माहिती मिळू शकतो. अशा परिस्थितीत गरजेचे आहे की, आपल्या आधार कार्ड सुरक्षित ठेवणे.आधार कार्ड मध्ये तुमची जी काही माहिती नोंदीत असते ती फार संवेदनशील असते. आधार कार्डवर नाव,, पत्ता, आयरिस स्कॅन, फिंगरप्रिंट यासारखे संवेदनशील माहिती असते. आधार कार्ड धारकांची चिंता दूर करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने आधार नंबर ब्लॉक करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेद्वारे आधार नंबर द्वारे होणारी फसवणूक थांबवता येऊ शकते. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, तुम्ही एका मेसेज द्वारे तुमचा तर नंबर ब्लॉक करू शकता.
हेही वाचा:आधार कार्डमध्ये न पुरावा देता अपडेट करा मोबाईल नंबर
आधार नंबर ब्लॉक करण्याची प्रक्रिया
तुम्ही सगळ्यात अगोदर 1947 वर गेट ओटीपी लिहून एक मेसेज पाठवायचा असतो. त्यानंतर आधार कार्ड धारकांच्या मोबाईलवर एक ओटीपी येतो. ओटीपी मिळाल्यानंतर आधार कार्ड धारकाला LOCKUID आधार नंबर लिहून पुन्हा 1947 वर पुन्हा मेसेज पाठवा. त्यानंतर तुमचा आधार नंबर ब्लॉक केला जातो. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ने सुरक्षा या पर्यायासाठी मास्कड आधार कार्ड जारी केले आहे. हे एक इलेक्ट्रॉनिक आधार कार्ड असते. ज्याला सहजतेने डाऊनलोड करता येते.
Published on: 28 December 2020, 02:34 IST