News

मुंबई : केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यास मुदतवाढ दिली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Updated on 23 July, 2020 1:47 PM IST


मुंबई :  केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यास मुदतवाढ दिली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  यावर्षी पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेतले गेल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाले आहे.  त्यामुळे केंद्र शासनाने मका खरेदीस प्रथम १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.  परंतु अजून ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मका शिल्लक असल्याने मका खरेदीची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होती.  मका खरेदीस मुदतवाढ देण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे केली होती.

तसेच भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे संपर्क साधून राज्य शासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती केली होती.  त्यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला ‘ मका खरेदीस ३१ जुलैपर्यंत २५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यास मुदतवाढ दिली आहे.  केंद्राने राज्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, राज्यात यापुर्वी भरड धान्याची रब्बी हंगामामध्ये खरेदी केली जात नव्हती.  मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बीत जास्त प्रमाणात लागवड केली जात असल्याने रब्बीमध्ये शासनाने भरड धान्याची खरेदी करावी, अशी लोकप्रतिनीधींची मागणी होती.  दरम्यान लॉकडाऊनमुळे कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये मंदी आल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते.  त्यापार्श्वभूमीवर रब्बी हंगामात भरड धान्याची खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत राज्यात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे.  केंद्र सरकारने राज्य सरकारला ५ मे रोजी पाठवलेल्या पत्रानुसार, २५ हजार टन मका खरेदला परवानगी दिली होती.  त्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली होती. ५ जूनपाासून खरेदी प्रक्रियेला सुरुवात केली होती.

English Summary: Maize procurement will continue for another eight days, extension from the Center
Published on: 23 July 2020, 01:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)