News

आजकाल अनेक लोक सरकारी कृषी केंद्रापेक्षा लोक खाजगी कृषी केंद्राकडे वळू लागले आहेत. याची अनेक कारणे समोर आली आहेत.मका उत्पादक शेतकरी वर्गाला खाजगी म्हणजेच खुल्या बाजारात चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारी कृषी केंद्राकडे पाठ फिरवली आहे

Updated on 26 June, 2021 4:05 PM IST

आजकाल अनेक लोक सरकारी कृषी केंद्रापेक्षा लोक खाजगी कृषी केंद्राकडे वळू लागले आहेत. याची अनेक कारणे समोर आली आहेत.मका उत्पादक शेतकरी वर्गाला खाजगी म्हणजेच खुल्या बाजारात चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारी कृषी केंद्राकडे पाठ फिरवली आहे.

शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फायदा होत आहे:

आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या कृषी केंद्रावरून 1923 क्विंटल मका खरेदी झाली आहे. या नाशिक जिल्ह्यातील हमी भावाने 30 हजार क्विंटल मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे.सुरवातीच्या 3 महिने आधी मकेला 1100 रुपये ते 1300 रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मका ला मिळत होता. परंतु काही काळानंतर हाच भाव 1900 च्या घरात गेला त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फायदा होत आहे.

हेही वाचा:आता उसाप्रमाणे मिळणार दुधाला एफआरपी

या जिल्ह्यातील कृषी बाजार समिती मध्ये 1800 रुपये क्विंटल इतका भाव मिळाला आहे. तर शासनाच्या खरेदी केंद्रावर 1850 रुपये एवढा भाव मिळाला आहे. तर काही वेळेस काही काही कृषी समित्यांमध्ये या पेक्षा ही दर जास्त आहे. तर काही शासकीय कृषी समित्यांमध्ये खूपच कमी दर मिळत असल्यामुळे मका उत्पादक शेतकरी यांनी खुल्या बाजारपेठे कडे धाव घेतली आहे.

या शिवाय खुल्या बाजार पेठेत मिळणारी रक्कम सुद्धा रोख स्वरूपाची असते. याउलट सरकारी कृषी समित्यांमध्ये रोख पैसे मिळत नसत. त्यामुळं शेतकरी वर्ग खुल्या बाजारपेठेकडे धाव घेत.याशिवाय खुल्या बाजारात मका बरोबरच गहू ज्वारी बाजरी या पिकांची सुद्धा जोरदार खरेदी आणि विक्री मोठ्या प्रमाणात होते. रोख मिळणारी रक्कम आणि वाढता दर यामुळे शेतकरी वर्ग आकर्षित होऊन खुल्या बाजाराकडे धाव घेत आहेत.

English Summary: Maize growers turn their backs on government procurement centers, find out the reason behind this
Published on: 26 June 2021, 03:58 IST