News

भारतात आगामी काही दिवसात खरीप हंगामाची पेरणी सुरु होणार आहे. यासाठी शेतकरी बांधव पूर्वमशागतीच्या कामांसाठी लगबग करताना बघायला मिळत आहेत. राज्यातील नव्हे नव्हे तर संपूर्ण देशात रब्बी हंगामातील गव्हाची काढणी आता अंतिम टप्प्यात आहे.

Updated on 11 May, 2022 10:21 PM IST

भारतात आगामी काही दिवसात खरीप हंगामाची पेरणी सुरु होणार आहे. यासाठी शेतकरी बांधव पूर्वमशागतीच्या कामांसाठी लगबग करताना बघायला मिळत आहेत. राज्यातील नव्हे नव्हे तर संपूर्ण देशात रब्बी हंगामातील गव्हाची काढणी आता अंतिम टप्प्यात आहे.

एकंदरीत गव्हाची काढणी जसजशी शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे, तसाच रब्बी हंगामही शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारीही सुरू केली आहे.

यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी भात लावणीचे नियोजन करत आहेत, मात्र सध्याच्या परिस्थितीत हा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसाठी बनवलेले धोरण त्यांना श्रीमंत बनवू शकते.

खरे तर या खरीप हंगामात मका शेती ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या खरीप हंगामातील मका लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कशी ठरू शकते हेचं आपण जाणून घेणार आहोत.

रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मक्याची शेती ठरेल फायदेशीर 

रशिया आणि युक्रेनमध्ये अडीच महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. ज्याचा प्रभाव जगभर पडला आहे. खरं तर, रशिया आणि युक्रेन जगातील अनेक देशांना गहू, सूर्यफूल आणि मका पुरवठा करतात, परंतु दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये हे अन्नधान्य कमी होऊ लागले आहे.

त्यामुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये भारतीय गव्हाची मागणी वाढत आहे. त्यामुळे आजकाल गहू किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) जास्त दराने विकला जात आहे.

त्याचबरोबर मक्याचे भावही एमएसपीपेक्षा जास्त आहेत. आगामी काळात परदेशातूनही अशीच मागणी राहण्याची आशा आहे. यामुळे शेतकऱ्यांना मक्याचा चांगला भाव मिळणार असल्याचे सांगितले जातं आहे.

सध्या मक्याची किंमत MSP पेक्षा जास्त 

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय मक्काही आजकाल सुपरहिट ठरत आहे. सध्या मक्याचा भाव एमएसपीपेक्षा 800 रुपयांनी जादा आहे.

वास्तविक, एमएसपीची किंमत सरकारने 1870 रुपये प्रति क्विंटल ठरवली आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांच्या बाजारपेठेत मक्याच्या संकरित जातीचा भाव 2400 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल असा आहे.

शेतकरी बेबी कॉर्न कॅनडाला पाठवणार 

या खरीप हंगामात मका पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना नफा मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय मक्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे. त्याचबरोबर कॅनडामध्ये बेबी कॉर्न विकण्याचा पर्याय शेतकऱ्यांकडे आहे.

मुळात बेबी कॉर्न ही मक्याची अपरिपक्व अवस्था आहे. ज्याला परदेशात मोठी मागणी आहे. या संदर्भात गेल्या एप्रिलमध्ये कॅनडा सरकार आणि भारत सरकारमध्ये एक करार झाला आहे.

ज्या अंतर्गत भारतीय बेबी कॉर्नला कॅनडाच्या बाजारपेठांमध्ये मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे भारतीय शेतकऱ्यांनी पिकवलेले बेबी कॉर्न कॅनडाला पाठवले जाऊ शकणार आहेत.

English Summary: Maize Farming: Maize farming will be a boon to farmers this kharif season; The reason ..
Published on: 11 May 2022, 10:21 IST