News

वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट केंद्रसरकारने ठेवले होते. या पार्श्वभूमीवर एसबीआयचा अहवाल खूप महत्त्वाचा ठरतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2017-18 आणि 2021-22 या कालावधीमध्ये भारतातील शेतकऱ्यांची सरासरी उत्पन्नाचा विचार केला तर त्यामध्ये जवळ जवळ 1.3 ते 1.7 पट वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Updated on 19 July, 2022 3:52 PM IST

वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट केंद्रसरकारने ठेवले होते. या पार्श्वभूमीवर एसबीआयचा अहवाल खूप महत्त्वाचा ठरतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2017-18 आणि 2021-22 या कालावधीमध्ये भारतातील शेतकऱ्यांची सरासरी उत्पन्नाचा विचार केला तर त्यामध्ये जवळ जवळ 1.3 ते 1.7 पट वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनसारख्या पिकांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे देखील निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र सरकारने  अशोक दलवाई यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली होती व या समितीने काही वर्षापूर्वी14 खंडातील अहवाल सरकारला सादर केला होता.

या सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हणण्यात आले होते की,2015-16 आणि 2022-23 या कालावधीत कृषी आणि बिगर कृषी स्त्रोतांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये जर 10.4 टक्के वाढ झाली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.

नक्की वाचा:Crop Cultivation: मिरची लागवडीत वापरा 'या'पद्धती आणि करा खर्च कमी, मिळवा भरघोस उत्पन्न

या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेच्या भारतभरातील कृषी खात्याच्या प्राथमिक आकडेवारीच्या आधारे बँकेने सदर अहवाल तयार केला

असून आर्थिक वर्ष 2018 ते 2022 या कालावधीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील बदल कसा झाला हे समजावे यासाठी व्यापक, पुरेसा प्रातिनिधिक आणि संभाव्यता दर्शक नमुन्यांचा वापर केला आहे.यामध्ये छोटा शेतकरी ते मोठा शेतकऱ्यांपर्यंत सर्व स्तरातील शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले होते.

नक्की वाचा:भाजीपाला लागवड: जुलै महिन्यात करा 'या' 5 भाजीपाला पिकांची लागवड आणि कमवा भरपूर पैसा, वाचा सविस्तर माहिती

 शेतकरी कर्जमाफी बद्दल अहवालातील मुद्दे

1- 2014 पासून जे शेतकरी कर्जमाफी साठी पात्र आहेत अशा 37 दशलक्ष शेतकऱ्यांपैकी 50 टक्के शेतकऱ्यांना मार्च 2022 पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला.

2- काही राज्यांमध्ये जवळजवळ 90 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

जर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांची बाजाराची सुसंगत किमान आधारभूत किंमत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकरी अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळल्याचे दिसून आले.

3- एसबीआयने सादर केलेल्या या अहवालात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीला विरोध केला आहे.त्यांच्या मते शेतकऱ्यांना दिलासा देण्यात कर्ज माफी योजना अपयशी ठरली असून उलट कर्ज शिस्तीला बाधा पोहोचली आहे.

नक्की वाचा:योजना सरकारच्या: व्यवसायासाठी कुठल्याही हमीशिवाय 'ही' योजना देईल सर्वसामान्यांना कर्ज, होईल फायदा

English Summary: main points in sbi report about farmer income and debt forgiveness
Published on: 19 July 2022, 03:52 IST