New Delhi : भारतातील प्रमुख अग्रगण्य कृषी मीडिया हाऊस कृषी जागरण लवकरच भारतातील मिलियनेअर आणि यशस्वी शेतकऱ्यांसाठी एक विशेष अवॅार्ड शो घेऊन येत आहे. या प्रदर्शनात एकाच छताखाली देशातील अनेक कंपन्या आणि अनेक शेतकरी या पुरस्कार सोहळ्यामध्ये असणार आहेत . परंतु या अवॉर्ड शो चा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि या ह्या शो ला अजून आकर्षित बनवण्यासाठी कृषी जागरणला भारतातील नंबर वन ट्रॅक्टर ब्रँड महिंद्रा ट्रॅक्टरचा सपोर्ट मिळाला आहे. महिंद्रा ट्रॅक्टर्स -'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड्स 2023' ला टायटल स्पॉन्सरच्या रूपात घोषित करताना कृषी जागरणला अत्यंत आनंद होत आहे.
६ डिसेंबर पासून सुरू होणारा हा सन्मान सोहळा ८ डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे. तीन दिवसाचा हा मिलियनेअर फार्मर महाकुंभ सोहळा नवी दिल्लीतील आयआरएआयच्या पुसा मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. मिलीयनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 चा फक्त देशातील प्रत्येक शेतकऱ्यांचा सन्मान करणे हाच उद्देश नाहीये. यासोबत या सोहळ्यात कृषी कंपनी, व्यावसायिक, शेतकरी यांच्यासाठी खास विविध सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
अवॉर्ड शो मध्ये अनेक इंडस्ट्रीची साथ असणार आहे. त्यासोबतच महिंद्रा ट्रॅक्टर मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया 2023 हा भारतातील भारतीय शेतकऱ्यांच्या असाधारण यशांना ओळखण्याचा प्रयत्न करतो. ज्यांनी केवळ त्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही तर त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे लक्षपती केले. महिंद्राचे मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया 2023 भारतातील कृषी आणि संबंधित क्षेत्रातील खऱ्या क्षेत्रातील नायकांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांसह काही कॉर्पोरेट्सना एकाच छताखाली एकत्र आणेल.
या आनंदाच्या क्षणी कृषी जागरणचे संस्थापक आणि मु्ख्य संपादक एम.सी. डोमॅनिक म्हणाले की, “महिंद्रा ट्रॅक्टर्सला आमचे शीर्षक प्रायोजक म्हणून लाभल्याचा मला आनंद आहे. मी आणखी काय मागू शकतो. मागील 27 वर्षांपूर्वी स्वप्न पाहिले. ते आता सत्यात उतरत आहे. MFOI हे एक स्वप्न होते जे मला पूर्ण करण्यासाठी विश्वासू व्यक्तीची सकारात्मक गरज होती. आणि आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे."
या सोबतच कृषी जागरणच्या व्यवस्थापकीय संचालिका शायनी डोमॅनिक म्हणाल्या की, "सुवर्णकारांना खरे रत्न ओळखण्याचा डोळा असतो.” त्यामुळे आता महिंद्रा ट्रॅक्टर्स सोबत प्रवास करतान मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया 2023 भारतीय कृषी बंधुत्वासाठी ऑस्कर बनण्याच्या मार्गावर आहे.
Published on: 14 November 2023, 02:58 IST