शेतकऱ्यांसाठी महिंद्रा कंपनीने एक आनंदाची बातमी दिली आहे. शेतकऱ्यांना कमी किंमतीत अवजारे देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात महिंद्रा कंपनी शेती उपकरणांची दमदार विक्री केली. याविषयीची माहिती शेती उपकरणे विभाग महिंद्रा अँण्ड महिंद्रा लिमिटेडचे अध्यक्ष हेमंत शिक्का यांनी दिली. ऑगस्टमधील शेती उपकरणांची मागणी तसचे उत्पादन, ट्रॅक्टर विक्रीविषयी चर्चा या संदर्भात त्यांनी माहिती दिली. मागील महिन्यात उपकरणांची आम्ही विक्री चांगली केली आमच्या ट्रॅक्टर व्यवसायात ७० टक्क्यांनी वाढ झाली. ऑगस्ट महिना आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
जुलै महिन्यात विक्रीचा दर थांबला होता. पण आम्ही येणाऱ्या दोन महिन्यांपर्यंत आमच्या सर्वोकृष्ट कामगिरीची नोंद यशस्वीपणे करु शकलो असल्याचे शिक्का म्हणाले. शिक्का पुढे बोलताना म्हणाले की, काळजीपुर्वक पाहिल्या या कामगिरीचे कारणे स्पष्टच आहेत. लॉकडाऊन दरम्यान रब्बी पिकांची कापणी केली जात होती आणि ही वेळ अशी होत, जेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांनी शेतकऱ्यांच्या सर्व बाजूंनी पाठिंबा दर्शविला होता. अत्यावश्यक सेवांमध्ये शेतीचे वर्गीकरण केले, यामुळे रब्बी पिकांची चांगली काढणी झाली आणि बाजारात विक्री चांगली झाली. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळाला तर याक्षणी शेतकऱ्यांकडे चांगली रक्कम उपलब्ध होणार यात शंका नाही. दुसरे म्हणजे मॉन्सून देखील यावर्षी चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत १० टक्के अधिक पाऊस झाला. मागील वर्षाच्या पेरणीची तुलना यावर्षाशी केल्यास निश्चित वाढ झालेली दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, आणि येत्या काळात रोख प्रवाहही चांगला राहिल असा विश्वास शिक्का यांनी व्यक्त केला. यामुळे शेती उपकरणे खरेदीचा कल देखील वाढेल. आम्ही धान्य कापणीच्या यंत्रावरदेखील काम करत आहोत.
कारण सध्या त्याची मागणी जास्त आहे. या क्षेत्रात आमची क्षमता वाढवायची आहे. या उद्देशाने आम्ही पुरवठारांसह कार्य करीत आहोत आणि त्यांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत. म्हणून आम्ही या नवीन यंत्रणांचा अवलंब करीत आहोत, जेणेकरून केवळ ट्रॅक्टरचीच क्षमता नाही तर संपूर्ण शेतातील मशीनची क्षमता वाढण्यास मदत मिळेल. आम्ही आता त्या दिशेने बरेच काम करीत आहोत आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बरेच काम करीत आहोत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी नवीन उत्पादने बाजारत आणत आहोत. परंतु जपानी किंवी युरोपातील उपकरणे भारतात आणण्याचा विचार केला तर किंमतीमध्ये फार वाढ होणार आणि हे सर्वसामान्य जनतेला परवडणार नाही. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान कमी किंमतीत आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू हे आपले व कंपनीचे लक्ष्य आहे असे शिक्का यांनी सांगितले.
Published on: 09 September 2020, 11:50 IST