चंदीगढ, २6 ऑगस्ट २०२४ – महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टर ही संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आपल्या रोटाव्हेटर्स श्रेणीद्वारे भारतातील जमीन मशागत क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सज्ज होत आहे. ही श्रेणी भारतातील प्रत्येक प्रकारची आणि पिकासाठी योग्य आहे. महिंद्रा देशातील सर्वात मोठ्या रोटाव्हेटर्स कंपन्यापैकी एक असून ही श्रेणी रिसर्च टीमने जागतिक नियम आणि दर्जा डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे. कंपनी सातत्याने शेतकऱ्यांचे अभिप्राय घेत त्यांच्यासाठी दमदार कामगिरी, विश्वासार्हता आणि दीर्घकाळ टिकणारी, शेतीच्या प्रत्येक प्रकारासाठी योग्य असलेली उत्पादने बनवण्यावर भर देते. भारतीय बनावटीचे महिंद्रा रोटाव्हेटर्स नाभा, पंजाब येथील खास उत्पादन केंद्रात बनवण्यात आले आहेत.
महिंद्राचे रोटाव्हेटर्स जमीन मशागतीसाठी लागणारा वेळ आणि कष्टचा सर्वोत्तम वापर करतात. त्याशिवाय हे रोटाव्हेटर्स बियाणांचा दर्जा उंचावतात, तणावर नियंत्रण ठेवतात आणि मातीचा दर्जा उंचावतात. महिंद्रा रोटाव्हेटर्स १५ ते ७० एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर्स श्रेणीसाठी सुसंगत असून वेगवेगळ्या प्रकारच्या मातीसाठी योग्य आहे. रोटाव्हेटर्स मशागतीसाठी कमी इंधन लागेल अशा पद्धतीने तयार करण्यात आले असून ते दीर्घकाळ टिकतात. महिंद्रा रोटाव्हेटर्सचे ब्लेड्स खास स्टील अलॉय ब्रँडेड ‘बोरो ब्लेड’ने तयार करण्यात आले आहेत व ते मातीचा प्रकार कठीण असला, तरी दीर्घकाळ टिकतात.
प्रगतीशील शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी महिंद्रातर्फे ‘इंटेलिजंट रोटाव्हेटर्स’ची श्रेणी उपलब्ध करण्यात आली आहे, जी रोटाव्हेटरमध्ये असलेल्या ब्लुटुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने अॅपद्वारे संवाद साधते.
महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या फार्म इक्विपमेंट सेक्टर विभागाचे अध्यक्ष श्री. हेमंत सिक्का भारतातील जमीन मशागतीचे यांत्रिकीकरण करण्याबद्दल म्हणाले, ‘आधुनिक शेती उपकरणे विकसित होत आहेत तसे, रोटाव्हेटर्समुळे शेतीतील उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता चांगल्याप्रकारे वाढत असल्याचे दिसून आले आहे. महिंद्राने भारतातील रोटाव्हेटर तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली असून ते आमच्या ‘ट्रान्सफॉर्म फार्मिंग अँड एनरिच लाइव्हज’ या तत्वाशी सुसंगत आहे.’
महिंद्रा अँड महिंद्रा लि. च्या फार्म मशिनरी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. कैरस वखारिया म्हणाले, ‘महिंद्रामध्ये आम्ही भारतातील जमीन मशागतीसाठी लागणारा वेळ आणि कष्ट कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. इतक्या वर्षांत शेतकऱ्यांसह काम करून आम्ही रोटाव्हेटर्सची सर्वसमावेशक श्रेणी तयार केली आहे. महिंद्राने नाभा, पंजाब येथे जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र तयार केले आहे. कंपनीची विस्तारित विक्री, सेवा आणि सुट्या भागांचे नेटवर्क तसेच संपूर्ण श्रेणीवर दिली जाणारी २ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी यांच्या मदतीने आम्ही शेतकऱ्यांचा आमचे उत्पादन वापरण्याचा अनुभव उंचावत आहोत.’
महिंद्राच्या रोटाव्हेटर्सची विक्री महिंद्राच्या ट्रॅक्टर डीलर नेटवर्कच्या माध्यमातून केली जाते. त्यासह महिंद्रा फायनान्सद्वारे शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि आकर्षक कर्जही मिळवून दिले जाते.
शेतकऱ्यांच्या मनःशांतीसाठी महिंद्राच्या रोटाव्हेटर्सवर बाकीच्या उत्पादकांतर्फे दिल्या जाणाऱ्या ६ ते १२ महिन्यांच्या वॉरंटीच्या तुलनेत या क्षेत्रातील आघाडीची, २ वर्षांची वॉरंटी दिली जाते.
भारतातील शेती यांत्रिकीकरणातील लीडर्स
५० देशांत कार्यरत असलेली महिंद्रा भारतातील शेतजमिनीच्या यांत्रिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत असून कंपनीने भारत व जगभरातील शेतकऱ्यांना अग्रेसर तंत्रज्ञान उपलब्ध करून देत त्यांच्या विकासाचे ध्येय ठेवले आहे.
‘ट्रान्सफॉर्म फार्मिंग, एनरिच लाइव्हज’ या तत्वाने प्रेरित आणि संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी या नात्याने महिंद्राचा फार्म इक्विपमेंट विभाग सातत्याने शेती क्षेत्रातील बदलत्या गरजा शेती यंत्रांची संपूर्ण उत्पादन श्रेणी आणि सुविधा (ट्रॅक्टरशिवाय) जगभरातील विविध बाजारपेठांत मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर पूर्ण करत आहे. त्यासाठी कंपनीने गेल्या दशकात संपादनांच्या माध्यमातून ग्लोबल टेक्नोलॉजी सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन केली आहेत. ही सेंटर्स महिंद्राला जगभरातील मोठ्या शेतांत वापरले जाणाऱ्या तंत्रज्ञानापैकी भारतीय बाजारपेठेसाठी योग्य तंत्रज्ञान परत आणून ती वापरण्याची मुभा देतात. यामुळे भारत व जगभरातील छोट्या शेतकऱ्यांना दर्जेदार तंत्रज्ञान सहज उपलब्ध होते.’
Published on: 28 August 2024, 05:21 IST