1. बातम्या

महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्सने क्रॉप केअर व्यवसायासाठी जपानमधील सुमितोमो कॉर्पोरेशनशी केली संयुक्त भागीदारी

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लि. (एमएएसएल) या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या उपकंपनीने, जपानमधील सुमितोमो कॉर्पोरेशन ग्रुप या पीकनिगा यासह विविध उद्योगांत कार्यरत असणाऱ्या व नवे पीक संरक्षण तंत्रज्ञान उपलब्ध असणाऱ्या आघाडीच्या जागतिक समूहाशी आज सहयोग केला. महिंद्रा सुमित अॅग्रीसायन्स लिमिटेड या नव्या कंपनीमध्ये, महिंद्रा व सुमितोमो कॉर्पोरेशन यांचा हिस्सा अनुक्रमे 60% व 40% असेल व त्यासाठी दोन्ही पक्षांनी सर्व संबंधित मंजुरी मिळवणे अधिन आहे. दोन्ही भागधारकांच्या एकत्रित क्षमतेमुळे, एमएएसएलचा क्रॉप केअर उद्योग नवी झेप घेणार आहे.

ही भागीदारी, शेतकऱ्यांपुढील किटक व किडे यांच्याशी संबंधित आव्हाने प्रभावीपणे हाताळण्याच्या हेतूने, विशेष व नवी मॉलिक्युल असलेली स्पेशालिटी, अत्याधुनिक उत्पादने सादर करणार आहे.

संयुक्त भागीदारीवर स्वाक्षरी करताना, महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शर्मा म्हणाले, “पिकांना होणारे नुकसान लक्षणीय प्रमाणात कमी करेल, असे जागतिक दर्जाचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी सुमितोमा कॉर्पोरेशन या आघाडीच्या जागतिक कंपनीशी सहयोग करणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या सहयोगामुळे, महिंद्राचा कृषी क्षेत्रातील विस्तृत व्यवसाय व सुमितोमाचे जागतिक कौशल्य एकाच व्यासपीठावर आणले जाणार असल्याने, ही भागीदारी दोन्ही कंपन्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पीकनिगेची जागतिक दर्जाची उत्पादने उपलब्ध केल्याने आम्ही शेतकऱ्यांना सुबत्ता मिळवून देऊ व त्यांचा उदय (राईज) होण्यासाठी हातभार लावू, असा विश्वास आहे.”

संयुक्त भागीदारीविषयी बोलताना, सुमितोमो कॉर्पोरेशनच्या अॅग्रीसायन्स विभागाचे जीएम तोमाकी तेत्सु म्हणाले, “महिंद्रा समूहातील एक महत्त्वाची कंपनी असणाऱ्या व महिंद्रा या विश्वासार्ह ब्रँडद्वारे कार्यरत असणाऱ्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्सशी भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. महिंद्रा सुमित अॅग्रीसायन्स लिमिटेड या नव्या कंपनीला भारतीय बाजारातील महिंद्राच्या सखोल विस्तराचा लाभ होईल आणि आम्हाला महिंद्रा समूहातील अन्य कंपन्यांशीही भागीदारी करता येईल, अशी अपेक्षा आहे. भारतातील प्रगती विचारात घेता, या संयुक्त भागीदारीमुळे भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व उत्पादने या बाबतीत नावीन्यपूर्ण सेवा उपलब्ध होऊ शकेल व त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल.”

या संयुक्त भागीदारी कंपनीला दोन्ही कंपन्यांच्या क्षमतांचा लाभ मिळणार आहे. महिंद्राचा ग्रामीण भागातील सक्षम विस्तार व सुमितोमाचे जपानी तंत्रज्ञानातील ज्ञान. शेतकऱ्यांशी सहयोग, देशांतर्गत वितरण व शेतीतील कौशल्य याद्वारे महिंद्रा योगदान देणार आहे, तर सुमितोमो कॉर्पोरेशनचे पीक संरक्षण क्षेत्रातील मोठ्या व नावीन्यपूर्ण जपानी कंपन्यांशी सहयोग आहे. परिणामी, या संयुक्त भागीदारीला पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी व उत्पादन वाढवण्यासाठी नवे जागतिक तंत्रज्ञान सहज उपलब्ध होणार आहे.

जपानी संशोधन व विकास केंद्रांशी सहयोग असलेली संयुक्त भागीदार कंपनी असणारी एमएएसएल ही पहिली भारतीय कंपनी असणार आहे. यामुळे जपानमधील नवे तंत्रज्ञान व उत्पादने भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निश्चित मदत होणार आहे. 2005 मध्ये सुरुवात झालेल्या, एमएएसएलच्या क्रॉप केअर उत्पादनांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके, हर्बिसाइड, बायोलॉजिकल उत्पादन व पाण्यात विरघळणारी खते यांचा समावेश आहे. सुमितोमाची सुरुवात 17व्या शतकाच्या सुरुवातीला, कॉपर मायनिंग या व्यवसायाने झाली. सन 1992 पासून, सुमितोमो कॉर्पोरेशनने पीकनिगा वितरण माध्यमात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि आज ही कंपनी 33 देशांत कार्यरत आहे.

आज, किडींचा हल्ला व रोग यामुळे भारतात मूल्याच्या बाबतीत एकूण उत्पादनातील अंदाजे 40% उत्पादन वाया जाते. यापुढे भारतातील दरडोई क्षेत्र केवळ घटत जाणार असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादकतेमध्ये सुधारणा करूनच शेती उत्पादनात वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे, पीक-पूर्व व नंतरच्या व्यवस्थापनामध्ये, पिकांचे संरक्षण करणारी उत्पादने यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मूल्याच्या बाबतीत, सध्या पिकांचे संरक्षण करणाऱ्या उत्पादनांचा वापर अंदाजे 2.5 अब्ज डॉलर इतका केला जातो व पुढील काही वर्षांत त्यामध्ये वार्षिक 7% वाढ होण्याची अपेक्षा आहे. बाजारात इतकी प्रचंड संधी असल्याने व संघटित कंपन्यांची संख्या मोजकी असल्याने, भारतात पीक संरक्षण व्यवसायासामध्ये क्रांती आणण्याच्या दृष्टीने या संयुक्त भागीदारीसाठी मुबलक संधी आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters