भारतीय क्रिकेट संघाच्या पूर्व कप्तान महेंद्रसिंग धोनी यांच्या इजा फार्मचे नवीन आऊटलेट्सचे उद्घाटन रविवारी रांची येथे झाले. या आपल्या आऊटलेट्सचे उद्घाटन रांचीच्या मेन रोडवर असलेल्या सुजाता चौक जवळ झाले.
या आउटलेटचे उद्घाटन धोनीचे सगळ्यात जवळचे मित्र परमजीत सिंह यांनी केले. या प्रसंगी महेंद्रसिंग धोनी यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. महेंद्रसिंग धोनी यांच्या इजा फार्ममध्ये पिकलेल्या भाज्यांची जबरदस्त मागणी आहे. धोनी यांच्या ऑरगॅनिक भाजीपाला फक्त परदेशात जात होता. आता तो रांचीच्या लोकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या चार तासात आउटलेट स मध्ये विक्रीसाठी आणलेल्या उत्पादनांची अर्ध्यापेक्षा जास्त विक्री झाली. याआधी लालपुर मध्ये उघडलेल्या इजा फार्मच्या आऊटलेट्स मधून दुधाची होम डिलिव्हरी केली जात होती. इजा फार्मच्या आऊटलेट्स उद्घाटनानंतरलोकांची खरेदी करण्यासाठी एकच गर्दी उडाली. क्रिकेट पासून संन्यास घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या शेतकरी व्यवसायाला सुद्धा लोकांचे भरपूर प्रेम मिळत आहे.
रांचीमध्ये उघडलेल्या धोनी यांच्या इजा फार्मच्या आउट लेट्स मधून ऑरगॅनिक भाजीपाला, फळ यांच्याव्यतिरिक्त यांच्याव्यतिरिक्त डेअरी उत्पादनांची सुद्धा विक्री केली जाते.डेअरी पहिल्या दिवशीच ग्राहकांनी या आऊटलेट्स मधून भरपूर प्रमाणात खरेदी केली. त्यांचे उत्पादन हे गुणवत्ता आणि किफायती आहे. इजा फार्मचा या आऊटलेट्स मध्ये 50 रुपये किलो मटार, 60 रुपये किलो शिमला मिरची, पंधरा रुपये किलो बटाटे तसेच पपई, ब्रोकलीइत्यादी फळे पंचवीस रुपये किलो मिळत आहेत.
त्याशिवाय दूध 55 रुपये लिटर आणि तूप तीनशे रुपये मध्ये दोनशे पन्नास ग्राम या भावाने विकले जात आहे. याशिवाय दोन्हीच्या फार्ममध्ये उत्पादित स्ट्रॉबेरी चा 200 ग्रॅम चा डब्बा चाळीस रुपयांमध्ये मिळतो. महेंद्रसिंग धोनी यांचे रांचीमध्ये त्रेचाळीस एकर वर फार्म हाऊस आहे. येथे भाजीपाला आणि फळांची शेती केली जाते.
Published on: 23 March 2021, 08:10 IST