पेट्रोल आणि डिझेल तसेच स्वयंपाकाचा गॅस इत्यादी तर महागाईच्या उंबरठ्यावर पोहोचलेच आहेत, परंतु आता त्या पाठोपाठ राहिलेली कमी महावितरण ने कमी केली आहे. अगोदरच महागाईमुळे आर्थिक समस्यांचा सामना करत लागत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महावितरणने विजेच्या दरात वाढ करून परत एक झटका दिला आहे.
महावितरणने इंधन समायोजन आकारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली असून त्यामुळे अगोदरच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
महावितरणने इंधन समायोजन आकार मध्ये वाढ केल्यामुळे आता वीज ग्राहकांना जास्तीच्या आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे.
त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला आर्थिक फटका बसणार आहे. जर आपण इंधन समायोजन आकारामध्ये वाढीसंदर्भात विचार केला तर जेव्हा कोळसा आणि इंधनाचे दर वाढतात त्यावेळी MERC च्या परवानगीने ही दरवाढ केली जाते.
जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत असलेल्या इंधन समायोजन दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
या समायोजन आकार वाढीचा विचार केला तर मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता, त्याच्यापेक्षा काही अधिक पटीने सध्याचा इंधन समायोजन आकार वाढवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात देखील प्रतियुनिट पंचवीस पैशांची वाढ महावितरणने केली होती.
अशी आहे सध्याची दरवाढ
1- 0 ते 100 युनिट - आधी होते दहा पैसे आता झाले 65 पैसे
2- 101 ते 300 युनिट- याआधी होते 20 पैसे युनिट, आता झाले एक रुपये पंचेचाळीस पैसे युनिट
3- 301 ते 500 युनिट- या आधी होते 25 पैसे युनिट, आता झाली दोन रुपये पाच पैसे युनिट
4- पाचशे एक युनिटच्या वर- आधी होते 25 पैसे पर युनिट आता झाले दोन रुपये पस्तीस पैसे युनिट
Published on: 09 July 2022, 10:03 IST