सध्या महावितरण आणि शेतकरी यांच्यात वाद वाढतच चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूली करू नये, असा आदेश दिला आहे. मात्र, दुसरीकडे खराब झालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्याची अट घातली जात आहे. यामुळे शेतकरी नाराज आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत. खराब झालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्याची अट घातली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत शेती पंपांची वीज जोडणी कट करू नये किंवा शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करू नये असे आदेश दिले आहे.
असे असताना आता विद्युत वितरण कंपनीच्या वसुलीचा नवीन फंडा समोर आला आहे. खराब झालेला ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरण्याची अट घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्मर लवकर दिला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडला आहे.
कोल्हापूर, सांगली पाण्यात जाणार? कर्नाटककडून अलमट्टी धरणााची उंची वाढवण्याच्या हालचाली...
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही हीच परिस्थिती असल्याचे समोर आलं आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना आणि तोडणीवर आलेल्या ऊसाला पाणी देणं महत्वाचे आहे. ट्रान्सफॉर्मर बदलून मिळण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीक धोक्यात आली आहेत.
'ऊसतोडणी मुकादमांवर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा'
यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळं अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला संकटात गाठून त्यांच्याकडून वीज बिल वसूल करण्याचा नवीन मार्ग सापडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. यामुळे मात्र अवकाळी नंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
'मुकादम एका कारखान्याची ॲडव्हान्स बुडवून दुसऱ्या कारखान्याकडे जातो, तिथे अर्धे काम करून तिसऱ्याकडे जातो'
ऑस्ट्रेलियातून ५१ हजार टन कापूस आयात, शेतकऱ्यांसह संघटनांनी संताप व्यक्त, आयात शुल्कही माफ
शेतकऱ्यांनो बँकांनी सिबिल विचारलं तर थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करा
Published on: 30 December 2022, 12:36 IST