News

कृषिपंपांची थकबाकी हा पहिल्यापासून महावितरणचा डोकेदुखी ठरणारा विषय राहिला.बऱ्याचदा आवाहन करूनही शेतकरी वीज बिल अदा करत नाही.जर आपण घरगुती किंवा औद्योगिक वसाहतींमधील वीजबिल वसुली चा विचार केला तर तुलनेने कृषी पंपधारक विज बिल भरतच नाही.

Updated on 18 November, 2021 1:34 PM IST

कृषिपंपांची थकबाकी हा पहिल्यापासून महावितरणचा डोकेदुखी ठरणारा विषय राहिला.बऱ्याचदा आवाहन करूनही शेतकरी वीज बिल अदा करत नाही.जर आपण घरगुती किंवा औद्योगिक वसाहतींमधील वीजबिल वसुली चा विचार केला तर तुलनेने कृषी पंपधारक विज बिल भरतच नाही.

शिवाय शेतीच्या सिंचनाचा विषय असल्यामुळे तेथे वीजपुरवठाही खंडित करता येत नाही. या सगळ्या गुंतागुंतीच्या समस्या वर पुणे परी मंडळाने एक रामबाण उपाय काढलेला आहे.

 यानुसार पुणे परिमंडळाकडून कृषी पंप वीज बिलांच्या थकबाकी मधून मुक्त होण्यासाठी थेट कृषी पंप ग्राहकांना 66 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे पुणे परिमंडळातील तब्बल बारा लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे.या योजनेमुळे महावितरणची वीज बिल वसुली तर झालीच परंतु आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना देखील खूप दिलासा मिळाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घेतला याचा लाभ

 कृषी पंप विज जोडणी धोरणांमधून कृषी पंप विज बिल यांच्या थकबाकी मुक्ती साठी थेट 66 टक्के सूट देण्यात येत आहे त्यामुळे याचा लाभ पुणे परिमंडळातील पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकी पैकी 50 टक्के रकमेचा त्याच्या मार्च 2022 पर्यंत जर भरणा केला तर तब्बल चार हजार तीन कोटी रुपयांचे माफी मिळणार आहे.

जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर तेथील एक लाख 80 हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत या सवलतीचा लाभ घेतलेला आहे. पुण्या परिमंडळातील 13754 शेतकरीही थकबाकी मुक्त झाले आहेत.

पुणे,सातारा,सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांकडे 10 हजार 841 कोटींची थकबाकी आहे या एकूण व थकबाकी मधून2644 कोटी 77 लाख रुपये महावितरणने सूट केले आहेत.तसेच पाचव्या झाली माफ करण्यात आले.तसेच थकबाकी वरील व्याज देखील माफ करण्यात आले आहेत.

English Summary: mahavitarn pune parimandal give 66 percent discout to fill pending electricsity bill
Published on: 18 November 2021, 01:34 IST