News

कृषी पंप विज जोडणी खंडित केल्याप्रकरणी तसेच सदोष वीज बिलामध्ये दुरुस्ती करावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. हा प्रश्न राज्याच्या विधानसभेत देखील खूप गाजला.

Updated on 10 March, 2022 9:21 AM IST

कृषी पंप विज जोडणी खंडित केल्याप्रकरणी तसेच सदोष वीज बिलामध्ये दुरुस्ती करावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. हा प्रश्न राज्याच्या विधानसभेत देखील खूप गाजला.

कारण यामध्ये दिवसागणिक वाढते वीज बिलांच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे.  त्यामुळे वीज बिल भरण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे आता महावितरणने एक पाऊल पुढे टाकत वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी शिबिर घेण्याचे ठरवले आहे. सदोष वीज बिलांच्या तक्रारींमध्ये कृषीपंप धारकांची संख्या मोठी आहे. कृषी वीज पंप ग्राहकांच्या तक्रारी व शंका सोडवण्यासाठी महावितरणकडून10  मार्चपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजनकरण्यात आलेआहे. हे शिबिर 10 मार्च ते 31 मार्च या दरम्यान राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये बहुतांशी मीटर वाचन,ग्राहकांचा मंजूर वीज भार तसेच थकबाकी या स्वरूपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच कृषी पंप ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजुरीचे प्रस्ताव महावितरणाच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करून देयक दुरुस्ती नंतरची सुधारित थकबाकी रक्कम ग्राहकाला कळेल.

 थकबाकीचे स्वरूप

 सप्टेंबर 2020 च्या शेवटपर्यंत कृषी पंप ग्राहकांकडे एकूण 45 हजार 802 कोटी रुपये थकबाकी झालेले आहे. यासाठी शासनाने कृषी ग्राहकांच्या हितासाठी सर्व समावेशककृषी पंप विज जोडणी धोरण 2020 जाहीर केले होते. 

या जाहीर केलेल्या धोरणांतर्गत निर लेखनाद्वारे दहा हजार चारशे वीस कोटी सूट, व्याज व विलंब आकारांमध्ये चार हजार 676 कोटी सूट दिल्यानंतर सुधारित थकबाकी 30 हजार 706 कोटी निर्धारित करण्यात आली आहे. या सुधारित थकबाकी पैकी दोन हजार 378 कोटी रकमेचा भरणा कृषिपंप ग्राहकांनी केला आहे.

English Summary: mahavitaran orgnised camp from today for solve problem to electricity pending bill of pump
Published on: 10 March 2022, 09:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)