News

महावितरणच्या बाबतीत विचार केला तर जनतेला बर्याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. वीजपुरवठा खंडित होणे, आपत्कालीन परिस्थितीचा तांत्रिक बिघाड किंवा चालू वीजदर, वीजदरातील बदल, बिलाविषयी तक्रारी तसेच नवीन वीज जोडणी यासारख्या तक्रारी करता तसेच वीज चोरी, नावातील बदल, सदोष मीटर बदलणे इत्यादी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक महावितरणने उपलब्ध करून दिले आहेत.

Updated on 06 September, 2022 10:57 AM IST

महावितरणच्या बाबतीत विचार केला तर जनतेला बर्‍याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. वीजपुरवठा खंडित होणे, आपत्कालीन परिस्थितीचा तांत्रिक बिघाड किंवा चालू वीजदर, वीजदरातील बदल, बिलाविषयी तक्रारी तसेच नवीन वीज जोडणी यासारख्या तक्रारी करता तसेच वीज चोरी, नावातील बदल, सदोष मीटर बदलणे इत्यादी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक महावितरणने उपलब्ध करून दिले आहेत.

परंतु आता राज्यातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला महावितरणचा एक टोल फ्री क्रमांकात बदल करण्यात आला आहे.  तो नवीन क्रमांक हा 1800-212-3435 हा असून अगोदर असलेले 1800-233-3435 आणि 1912 व 19120 या क्रमांकामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

नक्की वाचा:शिंदे सरकार जनतेला देणार झटका! वीज दरात वाढ होण्याची शक्यता

खंडित वीज पुरवठ्यासाठी मिसकॉल सेवा

 बऱ्याचदा वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या उद्भवते. याकरिता महावितरणने मिस कॉल सेवा सुरू केली असून यासाठी असलेल्या क्रमांक देखील बदल केला आहे.

यासाठी संबंधित वीज ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपली तक्रार नोंदवू शकतात.

नक्की वाचा:महा-ऊस नोंदणी ॲप लाँच, आता घरबसल्या 200 कारखान्यावर होणार उसाची नोंदणी, वाचा सविस्तर

 महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविण्याची पद्धत

 अजूनही बऱ्याच ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवलेले नसतील अशा ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा वरील जे काही टोल फ्री क्रमांक दिले आहेत त्यांना फोन करून स्वतःचा ग्राहक क्रमांक सांगून मोबाइल क्रमांकाची नोंद करू शकतात.

नक्की वाचा:कृषी जागरणचे २६ व्या वर्षात पदार्पण, देशातील शेतकऱ्यांचे हित जोपासणारा पहिला मीडिया हाऊस..

English Summary: mahavitaran change some important toll free number for customer
Published on: 06 September 2022, 10:57 IST