News

राजू शेट्टींनी बोलताना सांगितले की, संघटनेत महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र नाराजी आहे. संघटनेतील कार्यकर्ते महाविकास आघाडी सरकार तून बाहेर पडण्याच्या मूडमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एक कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

Updated on 18 March, 2022 9:33 PM IST

राजू शेट्टी राज्यातील राजकारणातील एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. माजी खासदार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यासाठी विशेष नावाजलेले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या महावितरणच्या वीज तोडणी विरोधात त्यांनी मोठा प्रखड आवाज उठवला होता.

आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राजू शेट्टी यांच्या मते, महाविकास आघाडी सरकारकडून जनतेची निराशा झाली असल्याने अशा सत्तेत आपण राहणार नाही आणि येत्या पाच तारखेला काहीतरी कठोर निर्णय घेऊ अस विधान त्यांनी जनतेपुढे मांडले आहे. एकंदरीत सत्तेत राहून जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर आपण यापुढे सत्तेत राहणार नाही अशा आशयाचे त्यांचे विधान आता समोर आले आहे.

राजू शेट्टींनी बोलताना सांगितले की, संघटनेत महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र नाराजी आहे. संघटनेतील कार्यकर्ते महाविकास आघाडी सरकार तून बाहेर पडण्याच्या मूडमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एक कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना सांगितले की, मी आमदारकीच्या आशेवर बसलेलो नाही  मला आमदार केले  नाही तरी चालेल असं म्हणत पाच तारखेला काहीतरी कठोर निर्णय घेऊ असे देखील नमूद केले.

महाविकास आघाडी सरकारवर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली असून पूर्वीच्या सरकारकडे झुकतं माप त्यांनी बोलून दाखवलं. शेट्टी यांनी सांगितले की, पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या योजना सर्वच नाव ठेवण्यासारख्या होत्या असं नाही त्या सरकारने आणलेल्या काही योजना या कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एक नवीन समीकरण तयार होण्याचे आसार व्यक्त केले जात आहेत. शेट्टी पाच तारखेला महाविकास आघाडी सरकारमधून जर बाहेर पडले तर कदाचित भाजपाशी हातमिळवणी करतील असे सांगितले जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकंदरीत येत्या पाच तारखेला राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल एवढे नक्की.

संबंधित बातम्या:-

अरे महावितरणा! पिकांची होळी होऊ दे पण या मुक्या जनावरांना प्यायला पाणी कसं द्यायचं? असं म्हणत शेतकऱ्यांनी........!

युट्युबचा असाही होतोय फायदा! युट्युब व्हिडीओ बघून या युवक शेतकऱ्याने माळरानावर लावली सीताफळची बाग; आता घेतोय लाखोंचे उत्पादन

English Summary: mahavikas aghadi government spoiled farmers determination therefore
Published on: 18 March 2022, 09:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)