News

महात्मा गांधी यांची आज 153 वी जयंती आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. जगातली अशी एकच व्यक्ति आहे, ज्यांचा संबंध गांधीवादाशी आला नाही.

Updated on 02 October, 2022 10:24 AM IST

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची आज 153 वी जयंती आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. जगातली अशी एकच व्यक्ति आहे, ज्यांचा संबंध गांधीवादाशी आला नाही.

महात्मा गांधी यांनी सत्याचा आग्रह आणि अहिंसा या गोष्टीच्या जोरावर जगात मोठे बदल घवडले आहेत. महात्मा गांधींचे असे काही विचार आहेत जे आपण आचरणात आणल्यास आयुष्यात नक्कीच सकारात्मक (positive) बदल घडतील. त्यामुळे आपण आज महात्मा गांधीच्या जयंती निमित्त महत्वाचे 5 विचार जाणून घेणार आहोत.

1) सर्वात पहिल्यांदा स्वत:मध्ये बदल करून घेऊया

महात्मा गांधी म्हणायचे जो बदल तुम्हाला जगात किंवा आजूबाजूला घडवायचा असेल तर बदल आधी तुम्ही स्वतः मध्ये घडवा. याचे कारण म्हणजे समाजातील अनेक गोष्टींविषयी आपण तक्रार करत बसतो. आपल्याला समाजात अनेक बदल अपेक्षित असतात. मग अशावेळी आपण स्वतामद्धे बदल करून घेयला हवेत.

महात्मा गांधी म्हणायचे मी परिपूर्ण नाही, माझ्यात ही अनेक वाईट गोष्टी आहेत. पण इतरांच्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी पाहतो. त्यामुळे आपण या गोष्टींचे आचरण करून स्वतामध्ये बदल केले पाहिजेत.

आनंदाची बातमी! 'या' दोन बँका FD वरील व्याजदर वाढवणार; गुंतवणूकदारांना मिळणार भरपूर लाभ

2) लहान गोष्टींमुळे तुम्ही बरेच सकारात्मक बदल घडवू शकता

महात्मा गांधी म्हणायचे एखाद्या छोट्याच्या गोष्टींमुळे तुम्ही जग बदलू शकता. एवढेच नाही तर तुम्ही जगामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही एखाद्या लहान बदलापासून होत असते. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

3) माफ करणे हा मोठेपणा

गांधी म्हणायचे एखाद्याने गुन्हा केलाच तर त्याला माफ करा, त्याच्याबद्दल बदलाची भावना कधीच ठेवू नका. प्रत्येकजण बदलाची भावना मनात ठेवून कृती करु लागला तर संपूर्ण जगच हिंसेच्या मार्गावर चालेल, जगातली मानवता संपेल त्यामुळे माफ करा. माफ करणे हे शुराच लक्षण असते.

बदलाची भावना ठेवून कुणाचंही भलं होऊ शकत नाही. त्यामुळे माफ करा, माफ करणं हे सर्वात मोठं काम आहे. एखाद्याला माफ करणं हे दुर्बलतेचं लक्षण (sign of weakness) नसून ते शूराचं लक्षण असल्याचेही महात्मा गांधी म्हणायचे.

शेतकरी मित्रांनो 'या' तारखेपासून भुईमुगाची पेरणी करा; मिळेल भरघोस उत्पादन

4) साधी राहणीमान महत्वाची

महत्वाचे म्हणजे गांधीजींनी स्वत: आयुष्यभर साधी राहणीमानाचे तत्व पाळले. तुमच्या गरजेपुरत्या गोष्टी बाजूला ठेवा. विशेष म्हणजे भौतिकवाद नाकारायचा ही गांधीजींची शिकवण. आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच वापरा, कारण पृथ्वी सर्वांच्या गरजा पुरवू शकते पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे यानुसार सर्वांनी राहिले पाहिजे.

5) आपल्या विचारानुसार वागणे चुकीचे

महात्मा गांधी म्हणायचे मनुष्य हा त्याच्या विचाराचा प्रोडक्ट (product) असतो. एखाद्या व्यक्ती ज्या पद्धतीने विचार करतात त्याच पद्धतीने त्याची जडणघडण होत असतो. एखाद्या व्यक्तीच्या मनात जो विचार येतो त्या पद्धतीने त्याचे वर्तन असते. त्यामुळे सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत.

महत्वाच्या बातम्या 
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरा 'हे' अफलातून जुगाड; पैशांची होणार बचत
शेतकऱ्यांनो रब्बीत कमी खर्चात पिकांचे उत्पादन दुप्पट करा; फक्त 'या' टिप्स कराव्या लागतील फॉलो

English Summary: Mahatma Gandhi Jayanti 2022 153rd birth anniversary
Published on: 02 October 2022, 10:23 IST