News

महाराष्ट्र राज्यातील जे काही सतरा लाख सरकारी कर्मचारी आहेत व त्यांच्यासोबत सहा लाख निवृत्त कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. एवढेच नाही तर कोरडवाहू शेतीसोबत चे बागायती शेतकरी आहेत त्यांना देखील अतिवृष्टीत हेक्टरी 27 हजार रुपये तीन हेक्टर पर्यंत मर्यादेत मदत देण्याचा निर्णय देखील शिंदे सरकारने घेतला आहे. एवढेच नाही तर राज्यातील 75 वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवास हा पूर्णपणे मोफत करण्यात आला आहे.

Updated on 17 August, 2022 11:29 AM IST

 महाराष्ट्र राज्यातील जे काही सतरा लाख सरकारी कर्मचारी आहेत व त्यांच्यासोबत सहा लाख निवृत्त कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या महागाई  भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. एवढेच नाही तर कोरडवाहू शेतीसोबत चे बागायती शेतकरी आहेत त्यांना देखील अतिवृष्टीत हेक्टरी 27 हजार रुपये तीन हेक्‍टर पर्यंत मर्यादेत मदत देण्याचा निर्णय देखील शिंदे सरकारने घेतला आहे. एवढेच नाही तर राज्यातील 75 वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना  एसटी बस प्रवास हा पूर्णपणे मोफत करण्यात आला आहे.

नक्की वाचा:फडणवीस पावरफुल! शिंदे आणि फडणवीस सरकारचे अखेर खातेवाटप; जाणून घ्या कोणाकडे कोणते खाते?

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. जर आपण अगोदरच या मदतीचा विचार केला तर जिरायती शेतीसाठी हेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये मदत दिली जाते व मागच्या महाविकास आघाडी सरकारने त्यामध्ये वाढ करून दहा हजार रुपये हेक्टरी  मदत दोन हेक्टर च्या मर्यादित दिली होती.

परंतु आता ती दुप्पट करून 13 हजार 600 रुपये मदत आणि तीदेखील 3 हेक्टरच्या मर्यादित देण्यात येणार आहे असे देखील त्यांनी म्हटले. एवढेच नाही तर बागायती शेतीसाठी अगोदर हेक्‍टरी 15 हजार रुपये मदत दिली जात होती ती आता वाढवून सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्‍टर तीन हेक्टर मर्यादेपर्यंत दिली जाणार आहे.

नक्की वाचा:राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; पाहा कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती

तसेच जी बहुवार्षिक पीके आहेत त्यांना आधी पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत दिली जात होती आता ती वाढवून छत्तीस हजार रुपये दिली जाईल.

 महागाई भत्ता ऑगस्टपासून

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला असून वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट 2022 पासून मिळणार आहे. त्यासोबतच जानेवारी ते जुलै 2022 दरम्यान ची थकबाकी देण्याबाबतचा आदेश देखील स्वतंत्रपणे काढला जाणार आहे.

नक्की वाचा:मोठी बातमी! MSP समितीच्या बैठकीची तारीख ठरली; शेतकऱ्यांसाठी होणार मोठा निर्णय

English Summary: maharshtra state goverment take some crucial decision about farmer and employee (1)
Published on: 17 August 2022, 10:19 IST