महाराष्ट्रामध्ये शेतीला होणाऱ्या वीज पुरवठा च्या बाबतीत कायमचे समस्या आहे. लोड शेडींग, आठ तास वीजपुरवठा तोही सलग न होता वारंवार खंडित होत असतो.
या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे अर्थमंत्री पी हरिष राव यांनी वक्तव्य केले आहे की वीजटंचाई मुळे त्रस्त झालेले महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणा शेती विकत घेत आहेत. अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य आहे. याविषयी त्यांनी तेलंगणाच्या वीजपुरवठा विषयी माहिती देतांना म्हटले की, तेलंगणामध्ये शेतीसाठी चोवीस तास वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे वीजपुरवठ्याच्या दृष्टीने तेलंगणातील शेतकरी जमिनीत जास्त प्रमाणात गुंतवणूक करतनक्की वाचा:या आजाराने दरवर्षी भारतात दगावतात हजारो बकऱ्या, यापासून वाचण्यासाठी लसीकरण हाच आहे एकमेव उपाय
आहेत असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हटले की उद्योजक कर्नाटकात जात आहेत तरच मराठी शेतकरी तेलंगणात येत आहेत. सिद्धी पेठ मतदारसंघात नर्सिंग कॉलेज च्या इमारतीचे भूमिपूजन तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरिष राव यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील वीज पुरवठ्याची परिस्थिती
महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त आठ तास वीजपुरवठा केला जातो व तो देखील अनियमित असा आहे. विजेचा लपंडाव हा तर पाचवीलाच पुजलेला आहे. जे आठ तास वीज पुरवठा केला जातो तोही कधी रात्री केला जातो तर कधी दिवसा केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या प्रश्नावर शेतकरी संघटनांनी देखील दहा तास वीज मिळावी यासाठी आंदोलन केले. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील चांगलेच आक्रमक झाले होते.
यावर तोडगा काढू असे आश्वासन सरकारकडून राजू शेट्टी यांना देण्यात आली आहे. तसेचदुसरी बाजूचा विचार केला तर शेतकऱ्यांकडून सदोष वीज बिलांची वसुली केली जात आहे. सध्या ती तीन महिन्यासाठी जरी थांबवण्यात आली आहे. परंतु जे आवडीच्या संवाद दिला आले आहेत त्यांचे काय हा देखील एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
Published on: 25 March 2022, 12:34 IST