महाराष्ट्रातील जनता साखरझोपेत असतानाच राज्यामध्ये अनलॉकचे आदेश जारी करत सरकारने नागरिकांची सकाळ गड केली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर हे नवे आदेश जारी करण्यात आले असून नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या आधारावर निर्बंध शिथील करण्यात आलेत. एकूण पाच स्तरांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशांमध्ये सर्वच गोष्टींचा उल्लेख आहे. जाणून घेऊयात हे पाच स्तर नक्की काय आहेत आणि कुठे कोणत्या सेवा सुरु असणार आहेत.
या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी
पहिला गट
ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.
दुसरा गट
पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.
तिसरा गट
पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.
चौथा गट
पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.
पाचवा गट
पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.
कुठे कोणत्या सेवा सुरु कोणत्या बंद?
अत्यावश्यक सेवेतील दुकाने
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
तिसरा गट > रोज दुपारी चार वाजेपर्यंत
चौथा गट > रोज दुपारी चार वाजेपर्यंत
पाचवा गट > आठवड्यातील पाच दिवस चार पर्यंत आणि विकेण्डला बंद
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
तिसरा गट > आठवड्यातील पाच दिवस दुपारी चार वाजेपर्यंत
चौथा गट > बंद
पाचवा गट > बंद
मॉल आणि चित्रपटगृहे
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > ५० टक्के क्षमतेने
तिसरा गट > बंद
चौथा गट > बंद
पाचवा गट > बंद
हॉटेल
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > ५० टक्के क्षमतेने
तिसरा गट > आठवड्यातील पाच दिवस दुपारी चार पर्यंत ५० टक्के क्षमतेने, नंतर केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलेव्हरी
चौथा गट > केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलेव्हरी
पाचवा गट > केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलेव्हरी
सार्वजनिक ठिकाणे, पार्क, मैदाने
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
तिसरा गट > पहाटे पाच ते सकाळी नऊ पर्यंत रोज सुरु ठेवता येणार
चौथा गट > पहाटे पाच ते सकाळी नऊ पर्यंत आठवड्यातून पाच दिवस, विकेण्डला बंद
पाचवा गट > बंद
खासगी कार्यालये
पहिला गट > सर्व
दुसरा गट > सर्व
तिसरा गट > सर्व पण दुपारी चार वाजेपर्यंतच
चौथा गट > निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्राशीसंबंधित कार्यालयांना परवानगी
पाचवा गट > निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्राशीसंबंधित कार्यालयांना परवानगी
कार्यालयांमधील हजेरी
पहिला गट > १०० टक्के
दुसरा गट > १०० टक्के
तिसरा गट > ५० टक्के
चौथा गट > २५ टक्के
पाचवा गट > १५ टक्के
क्रीडा
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > मैदानी खेळ दिवसभर, इंडोअर गेम्ससाठी सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ९ परवानगी
तिसरा गट > केवळ मैदानी खेळांना परवानगी सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९ परवानगी
चौथा गट > केवळ मैदानी खेळांना आठवड्यातून पाच दिवस परवानगी सकाळी ५ ते ९ परवानगी, विकेण्डला बंद
पाचवा गट > बंद
चित्रिकरण
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
तिसरा गट > बायोबबलमध्ये, सायंकाळी ५ नंतर बाहेर पडता येणार नाही
चौथा गट > बायोबबलमध्ये, गर्दीचे सीन शुट करता येणार नाही, ५ नंतर बाहेर पडता येणार नाही, विकेण्डला बाहेर जाता येणार नाही
पाचवा गट > बंद
संस्कृतिक आणि मनोरंजनाशीसंबंधित कार्यक्रम
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > ५० टक्के क्षमतेने
तिसरा गट > आठवड्यातील पाच दिवस ५० टक्के क्षमतेने, दुपारी चारनंतर परवानगी नाही
चौथा गट > बंद
पाचवा गट > बंद
लग्न समारंभ
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > ५० टक्के क्षमतेने आणि जास्तीत जास्त १०० जणांना जमण्याची परवानगी
तिसरा गट > ५० लोकांच्या उपस्थितीत परवानगी
चौथा गट > २५ लोकांच्या उपस्थितीत परवानगी
पाचवा गट > केवळ कुटुंबासहीत
ई कॉमर्स
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
तिसरा गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
चौथा गट > फक्त आवश्यक सेवा
पाचवा गट > फक्त आवश्यक सेवा
जीम, सलून, स्पा
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > ५० टक्के क्षमतेने अपॉइटमेंट घेऊन येणाऱ्या ग्राहकांनाच परवानगी
तिसरा गट > चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने अपॉइटमेंट घेऊन येणाऱ्या ग्राहकांनाच परवानगी, एसी वापरास बंदी
चौथा गट > चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने अपॉइटमेंट घेऊन येणाऱ्या लसीकरण झालेल्या ग्राहकांनाच परवानगी, एसी वापरास बंदी
पाचवा गट > बंद
सार्वजनिक वाहतूक सेवा
पहिला गट > नेहमीप्रमाणे सुरु करता येणार
दुसरा गट > १०० टक्के क्षमतेने उभ्याने प्रवासाला परवानगी नाही
तिसरा गट > १०० टक्के क्षमतेने उभ्याने प्रवासाला परवानगी नाही
चौथा गट > ५० टक्के क्षमतेने उभ्याने प्रवासाला परवानगी नाही
पाचवा गट > ५० टक्के क्षमतेने उभ्याने प्रवासाला परवानगी नाही
Published on: 05 June 2021, 09:30 IST