साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मितीची क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. पुढील वर्षाअखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
तसेच येणाऱ्या काळात देखील ही आकडेवारी अजूनच वाढल्याची शक्यता आहे. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, संपलेल्या गाळप हंगामात सर्वाधिक २१० साखर कारखान्यांकडून गाळप झाले. २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०५२ लाख टन ऊसाचे गाळप होऊन १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
साखर कारखान्यांनी मिळून ९६ टक्के उसाची एफआरपी शेतकऱ्यांना दिली. १६ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वर्ग झाली. ही यंदाच्या गाळप हंगामाची वैशिष्ट्ये ठरली आहे. आपल्या राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन आहे.
ऊस क्षेत्रात 70 हजार हेक्टरने वाढ, पुणे विभागात मोठी आघाडी..
असे असताना त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते. त्यापैकी २३ लाख टन साखर निर्यात होत असून पर्यायाने देशाच्या ६० लाख टन साखर निर्यातीत राज्याचा मोठा वाटा आहे. यामुळे हा आकडा मोठा आहे.
गुलाब शेती ठरली फायद्याची! केवळ 10 गुंठ्यांत लाखोंची कमाई..
दरम्यान, महाराष्ट्राची ब्राझिलच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. इथेनॉलच्या पुरवठ्यानंतर तेल विपणन कंपन्या २१ दिवसांत पैसे देत असल्याने साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा लाभत असून पर्यायाने शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
कारखान्यांच्या साखर विक्री दरात दोनशे रुपयांनी वाढ, कारखान्यांना दिलासा...
पुण्यात चार दिवस पावसाची शक्यता, शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत
रोहित पवार यांना धक्का! बारामती ॲग्रोबाबत मोठी बातमी आली समोर...
Published on: 05 May 2023, 11:26 IST