News

शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग (Agricultural processing industries) तयार व्हावेत, यासाठी केंद्र सरकारने देशस्तरावर प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Pradhan Mantri Food Processing Industry Scheme) सुरू केली आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे.

Updated on 03 April, 2022 4:50 PM IST

शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी केंद्र सरकार (Central Government) अनेक योजना राबवत आहे. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग (Agricultural processing industries) तयार व्हावेत, यासाठी केंद्र सरकारने देशस्तरावर प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Pradhan Mantri Food Processing Industry Scheme) सुरू केली आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे.

प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत देशामध्ये आतापर्यंत ३२१८ प्रकरणे मंजूर झाली आहेत. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वाधिक म्हणजे ५७९ प्रकरणे आहेत. त्यापैकी ४३४ प्रकरणांना कर्जही मंजूर करण्यात आले आहे.

शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तयार व्हावेत, यासाठी केंद्र सरकारने देशस्तरावर ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी केंद्राकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देण्यात येते. राज्याच्या कृषी खात्याच्यावतीने योजनेचा प्रचार करण्यात येत आहे. औरंगाबाद, सांगली व पुणे हे जिल्हे योजनेत आघाडीवर आहेत. राज्यातील सर्व म्हणजे ३६ जिल्हे यात सहभागी झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
एप्रिल महिन्यात 'या' भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा..!
निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले, मात्र 'या' पिकाला मिळतोय 'सोन्या'चा भाव

फळे, भाजीपाला, अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्य, दुग्ध (Fruits, vegetables, cereals, pulses, oilseeds, fish, dairy) तसेच अन्य किरकोळ वनउत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग या योजनेत सुरू करता येतात. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
नुकसान झाले तरी हार मानली नाही; दोन महिन्यात शेतकरी झाला मालामाल
Summer Plants: उष्णतेमुळे त्रास होतोय, घराला थंड ठेवायचे आहे तर लावा 'ही' झाडे

English Summary: Maharashtra ranks first in the country in food processing industry scheme
Published on: 03 April 2022, 04:50 IST