राज्यात फळे, भाजीपाला, व फुले (Fruits, vegetables, flowers) या पिकांची व्यवसायिक पध्दतीने शेती करण्याकडे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल्या दर्जाचे उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच फळे व भाजीपाला पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीठ या संकटाचा सामना करत शेतकरी भाजीपाला पिकवत आहे. अत्याधुनिक प्रणाली यामुळे नैसर्गिक संकटावर देखील मात करुन शेतकरी उत्पादनात वाढ करीत आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही फळे आणि भाजीपाला निर्यातीमध्ये (Export) महाराष्ट्राने आपले नेतृत्व कायम ठेवले आहे.
निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर वन
फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्राने मिळवला अव्वल क्रमांक मिळवला आहे. भाजीपाल्याप्रमाणेच फळांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर वन असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी एकट्या महाराष्ट्रातून 1 हजार 500 कोटी रुपयांचे उत्पादन हे कांदा निर्यातीमधून मिळाले आहे. शेती व्यसायात होत असलेल्या बदलाचे चित्र आहे.
निर्यातीमध्ये कांद्याचा डंका
शेतीमाल बाजारपेठेत पोहचवण्याची सन 2020-21 या वर्षात देशातून 15 लाख 74 हजार टन कांद्याची निर्यात झाली होती पैकी एकट्या महाराष्ट्रातून 8 लाख कांद्याची निर्यात होती. देशातील बाजारभाव टिकून ठेवण्यासाठी कांदा निर्यात उपयुक्त ठरत आहे. एकट्या महाराष्ट्रतील 8 लाख टन कांदा होता. कांद्याचे दर जरी घडीत बदलत असले तरी उत्पादनाच्या दृष्टीने त्याकडे पाहिले जात असल्याने दिवसेंदिवस क्षेत्र हे वाढत आहे.
शेतीमाल निर्यातीसाठी आवश्यक असलेली विमानतळे, बंदरे, 10 कोरडी बंदरे ,क्वारंटाईन लॅब, फूडपार्क यासारख्या अत्याधुनिक सुविधा ह्या वाढत आहे. शिवाय शेतकरी हे स्वीकारत आहे. त्यामुळे वाढत्या उत्पादनाला योग्य बाजारपेठेची जोड मिळू लागली आहे. शिवाय शेतीमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे.
Published on: 16 February 2022, 02:28 IST