News

नुकतेच दोन दिवसांपूर्वी मान्सून (Mansoon) केरळमध्ये दणक्यात आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान यामुळे पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आपले मत व्यक्त केले आहे.

Updated on 31 May, 2022 10:07 PM IST

नुकतेच दोन दिवसांपूर्वी मान्सून (Mansoon) केरळमध्ये दणक्यात आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान यामुळे पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आपले मत व्यक्त केले आहे.

राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने दस्तक दिली असून यामुळे उकाड्याने त्रस्त जनतेस मोठा दिलासा मिळाला आहे. गत 24 तासात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळाली.

भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, मराठवाड्यातील बीड उस्मानाबाद व विदर्भातील वर्धा या जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.

येत्या काही तासात मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील वर्ध्यात आज मुसळधार पावसाचे आगमन झाले. यावेळी वादळी वाऱ्याने देखील वर्ध्यात थैमान घातले होते. सध्या राज्यातील शेतकरी बांधव मान्सूनच्या प्रतीक्षेत चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात सोमवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राजधानी मुंबई समवेत अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्रात, दक्षिण कोकणात आणि मराठवाड्यात या संपूर्ण आठवडाभर पावसाचे वातावरण राहणार आहे. यामुळे निश्चितच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, हवामान खात्याने 4 जून पर्यंत मान्सून तळकोकण गाठणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मान्सून तळकोकण मध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसात राजधानीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जातं आहे यामुळे निश्चितच मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

English Summary: Maharashtra Rain: Indian Meteorological Department forecast !! Chance of torrential rains at 'Ya' in Maharashtra; Alerts in many areas
Published on: 31 May 2022, 10:07 IST