News

सध्या परतीच्या पावसामुळे अनेकांचे हाल सुरु आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे पाऊस कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हा परतीचा पाऊस उद्यापर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे 15 ऑक्टोबरपासून राज्यात उघडीपीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Updated on 14 October, 2022 10:45 AM IST

सध्या परतीच्या पावसामुळे अनेकांचे हाल सुरु आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे पाऊस कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हा परतीचा पाऊस उद्यापर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे 15 ऑक्टोबरपासून राज्यात उघडीपीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करता येणार आहेत. सध्या वातावरण जरी ढगाळ असेल तर राज्यात उघडीप जाणवेल असेही सांगितले जात आहे. तसेच 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान किरोकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळी सणादरम्यान साधारण 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे.

रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पाऊस पडणार आहे. मात्र, उद्यापासून राज्यात मान्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. त्यामुळं राज्यात पावसाची उघडीप होणार आहे. दरम्यान, पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.

सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती

यामध्ये मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. यामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे.

बारामतीत मुसळधार पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

तसेच द्राक्ष बागांना देखील या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आजही राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे आता याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची ऑनलाईन यादी जाहीर, शेतकऱ्यांनो तुमचं नाव करा चेक..
गहू उत्पादक राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ..
यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार? ३५ साखर कारखान्यांनी घेतली ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी

English Summary: Maharashtra Monsoon: Returning Monsoon agricultural work
Published on: 14 October 2022, 10:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)