यंदा च्या वर्षी शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हाती आलेलं पीक रानातच सडून गेल्यामुळे शेतकरी वर्गाला यंदा अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. यंदा च्या साली अवकाळीने पिकांना चांगलेच झोडपून काढले आहे त्यामुळे उत्पादन सुद्धा घटले आहे.सध्या बरेच शेतकरी भुसार पिकांची टाळाटाळ करून भाजीपाला लागवड करून बक्कळ नफा मिळवत आहे. इतर पिकांपेक्षा भाजीपाला शेतीमध्ये कष्ट खूपच कमी लागते शिवाय खतांचा वापर आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे अनेक कामे काही वेळातच मार्गी लागतात.
पायाभूत आणि मूलभूत सुविधांमुळे केवळ शक्य:-
सध्या शेतीमध्ये मोठे आमूलाग्र बदल झाले आहेत शिवाय उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तर त्यासाठी सुद्धा पायाभूत सुविधांचा आधार खूप गरजेचा आहे. शेतीमधील माल निर्यातीला अनेक गोष्टींची आवश्यकता असते त्यामध्ये विमानतळ, बंदरे,क्वारंटाईन लॅब, फूडपार्क या सारख्या सुविधा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामुळे शेतीमाल निर्यात प्रक्रियेमध्येगेल्या काही वर्षांत प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त भाजीपाला निर्यात करून आपले नेतृत्व उभे केले आहे. 2020 ते 2021 या साली महाराष्ट्र राज्याने देशातून 15 लाख 74 हजार टन कांद्याची निर्यात झाली होती पैकी एकट्या महाराष्ट्रातून 8 लाख कांद्याची निर्यात झाली होती.
सध्या राज्यातून भाजीपाल्याप्रमाणेच फळांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर वन आहे. या वर्षी महाराष्ट्रात राज्यातून 1 हजार 500 कोटी रुपयांचे उत्पादन हे कांदा निर्यातीमधून मिळाले आहेत. अश्या प्रकारे शेती व्यवसायामध्ये आमूलाग्र बदल होताना आपल्याला दिसत आहे.शेतीमाल निर्यातीसाठी आवश्यक असलेली विमानतळे, बंदरे, 10 कोरडी बंदरे ,क्वारंटाईन लॅब, फूडपार्क यासारख्या अत्याधुनिक सुविधा ह्या वाढत आहे. शिवाय शेतकरी हे स्वीकारत आहे. त्यामुळे वाढत्या उत्पादनाला योग्य बाजारपेठेची जोड मिळू लागली आहे. शिवाय शेतीमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे.
भाजीपाला निर्यातीमध्ये कांदा अव्वल:-
आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादक शेतकरी आहेत. तसेच भाजीपाला निर्यातीमध्ये सुद्धा सर्वात जास्त निर्यात ही कांद्याची होते. कांदा हे नगदी पीक असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कांद्याला मोठी मागणी आहे.यंदा 2020 ते 2021 या वर्षी आपल्या देशातून तब्बल 15 लाख 74 हजार टन एवढ्या कांद्याची निर्यात झाली. त्यापैकी फक्त महाराष्ट्र राज्यातून 8 लाख टन एवढा कांदा निर्यात झाला होता. कांद्याचे दर हे नेहमी कमी जास्त होत असतात परंतु कांदा पिकातून शेतकरी वर्ग बक्कळ पैसा कमवत असतो.
उत्पन्न कमी परंतु भावात वाढ:-
यंदा च्या वर्षी कांद्याच्या उत्पादनात जरी घट झाली असली तरी कांद्याचे भाव मात्र स्थिर राहिलेले आहेत. यंदा अवकाळी मुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच आवक वाढून पण कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. तसेच निर्यात सुरू झाल्यावर सुद्धा कांद्याचे भाव वाढतील अशी आशा शेतकरी वर्ग करत आहे.
Published on: 16 February 2022, 07:51 IST