पुणे, भारतात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आहेत. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात साखर तयार केली जाते. देशात सध्या साखर हंगाम सुरु आहे. अनेक कारखाने तेजीत सुरु आहेत. यामळे देशात डिसेंबर अखेरीस ११५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हा आकडा हंगाम संपेपर्यंत अजून वाढणार आहे. सध्या हंगाम संपायला बराच कालावधी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. यामुळे बाजारभाव देखील स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हे भाव कसे राहणार यावर बाजारभाव कमी जास्त होणार आहेत.
साखर उत्पादनात नेहेमीप्रमाणे राज्याने आघाडी घेतली आहे. तर उत्तर प्रदेश दुसऱ्या नंबरवर आहे. महाराष्ट्रात ४५ लाख टन साखर तयार झाली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये हा आकडा ३० लाख टन इतका आहे. राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त साखर कारखाने सुरु आहेत. यामुळे उप्तादन वाढण्यास मदत झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी दहा जास्त साखर कारखाने सुरु आहेत. यामुळे उप्तादन वाढण्यास मदत होत आहे. जवळपास १९० साखर कारखाने सध्या राज्यात सुरु आहेत. हे साखर कारखाने सध्या सुरु आहेत. अवकाळी पाऊस आणि वादळामुळे यामध्ये अनेकदा अडचणी आल्या मात्र सध्या हंगाम चांगला सुरु आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील साखर उतारा चांगला आहे. यामुळे यावेळी देखील चांगले उत्पादन वाढणार आहे. राज्यात कोल्हापूर विभागात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली आहे. साखर विक्रीचे बघितले तर यामध्ये देखील सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारने साखर विक्रीचा कालावधी वाढवला आहे. यामुळे आता पुढील दोन महिने विक्रीसाठी काही अडचणी येणार नाहीत. सरकारने हा कालावधी जानेवारीपर्यंत वाढवला आहे. यामुळे बाजारभाव देखील फारसे बदलणार नाहीत.
देशात जुनी साखर देखील मोठ्या प्रमाणावर अजून शिल्लक आहे. तसेच कच्ची साखर देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जात आहे. याची निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यामध्ये सरकारचा समतोल देखील आहे. असे असले तरी शेतकरी मात्र नाराज आहे. अनेक ठिकाणी ठरलेली एफआरपी दिली गेली नाही. यामुळे अनेक साखर कारखान्यांवर शेतकरी आंदोलने करत आहेत. अनेक साखर कारखान्यांवर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव देण्यास अनेक अडचणी येत आहेत. यामुळे अनेक कारखान्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच कर्ज घेतल्याप्रकरणी अनेक कारखान्यांची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे.
Published on: 11 January 2022, 06:31 IST