यावर्षी राज्यात 15 ऑक्टोबरपासून उसाच्या गाळप हंगामास सुरुवात झाली.त्यावेळेस काही साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी परवानगी न दिल्यामुळे काहीसाखर कारखाने चालू झाले नव्हते परंतु आता राज्यात 182 साखर कारखाने सुरू झाले आहेत.
हे संपुर्ण साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असून उत्पादनाबरोबरच साखर निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. यावर्षी असलेल्या पोषक वातावरणाचा परिणाम म्हणून साखरेचा उताराही चांगला मिळत असून देशातील एकूण साखर निल्याची पैकी जवळपास 70 टक्के निर्यात एकट्या महाराष्ट्रातुनहोत आहे. या पार्श्वभूमीवर देशांमध्ये असलेली साखरेचे वाढती मागणी तसेच देशांतर्गत वाढते उत्पादन आणि जागतिक पातळीवर होत असलेली मागणी यामुळे साखर उत्पादकांना अच्छे दिन येणार असल्याचे चित्र आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यापूर्वीच अंदाज व्यक्त केला होता की या वर्षी उसाचे विक्रमी गाळप होईल त्यानुसार आता हंगाम ऐन मध्यावर आलेला आहे.कारखानदारांचे देशांतर्गत पेक्षा निर्यातीवर अधिकचे उत्पन्न मिळणार आहे.परंतु सध्या साखरेचे दरही स्थिर असून नवीन वर्षातहे दर वाढतील असा अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे आता साखर कारखानदारी निर्यातीपेक्षा कच्च्या साखरेचे साठवणूक करीत आहेत.
अधिक दराच्या अपेक्षेने हे धाडस साखर कारखानदार करीत असून आतापर्यंत सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून झालेली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर देशात आणि जागतिक पातळीवर साखरेच्या उत्पादनात भारत कायम आघाडीवर राहिलेला आहे मात्र देशांतर्गत विक्री पेक्षा साखरेची निर्यात अधिकची फायद्याचे असल्याने कारखानेहेनिर्यातीवर भर देत आहेत.
(संदर्भ-Tv9मराठी)
Published on: 14 December 2021, 10:25 IST