मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतले आहेत. सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. (Petrol diesel)
त्याचबरोबर आता बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळणार असल्याचीही घोषणा केली आहे. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी (eknath shinde) या मोठ्या घोषणा केल्या आहेत.
पहिली मोठी घोषणा म्हणजे सरकारने (government) पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. व दुसरी मोठी घोषणा म्हणजे आता नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.
Breaking : पेट्रोल, डिझेल 'इतक्या' रुपयांनी झाले स्वस्त; शिंदे सरकारची मोठी घोषणा
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार (ग्रामविकास विभाग) बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना (farmer) थेट मतदानाचा अधिकार मिळणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार आहे. यासोबतच कोरोना (corona) प्रतीबंधक लस म्हणून राज्यातील १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वांना कोरोना प्रतीबंधक लस मिळावी हा हेतू साकार होणार आहे.
Maharashtra Cabinet Decision: शेतकरी ते पेट्रोल; वाचा शिंदे सरकारचे धडाकेबाज नऊ मोठे निर्णय
Published on: 14 July 2022, 04:10 IST