News

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखेच्या 2019 च्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये 2680 शेतकरी व 1247 शेतमजूर असे एकूण तीन हजार 927 जणांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लेखी उत्तरातदिली.

Updated on 08 March, 2022 10:09 AM IST

 राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखेच्या 2019 च्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये 2680 शेतकरी व 1247 शेतमजूर असे एकूण तीन हजार 927 जणांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लेखी उत्तरातदिली.

दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील व काही सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील माहिती देण्यात आली. राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका, नापिकी अथवा मान्यताप्राप्त सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्यामुळे वाढलेली कर्जाचे ओझे वया कर्जफेडीचा तगादा हे तीन निकष आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत देण्यासाठी ठरवण्यात आले आहेतआणि या निकषाची पुनर्विलोकन करण्याची आवश्यकता दिसून येत नाही असे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना जी मदत देण्यात येते त्यामध्ये एक लाख रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे समुपदेशन  व प्रबोधन, विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी समृद्धी योजना, शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा, आरोग्य सेवा, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण,शेती विकासाचे कार्यक्रम, 

शेतमालाला हमी भाव यासारख्या योजना राबवण्यात येत आहेत.त्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना राबवण्यात येत असल्याची माहिती उत्तरात दिली आहे.

English Summary: maharashtra goverment take decision about growth in compansation in sucide farmers family
Published on: 08 March 2022, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)