सध्या बदलत्या हवामान आणि पावसाचे अनियमितता यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान होते. यावर्षी आपण पाहिलेच की झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले.यामागे महत्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज हा वेळीच कळत नाही.
मुळे अचानक आलेल्या पावसाला तोंड देणे हे सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज कळावा व वेळेतपिकांची काळजी घेता यावे यासाठी राज्यात तब्बल 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र उभारली जाणार आहेत. सर्वात अगोदर जागांची लोकसंख्या पाच हजारांपेक्षा जास्त आहे.अशा गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे. असे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.
मागच्या वर्षी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. पावसाच्या लहरीपणामुळे तसेच अनियमिततेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदी झाल्या नाहीत. पाऊस, वारा तसेच येणाऱ्या अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची नोंदही तंत्रशुद्ध पद्धतीने होणार आहे.त्यामुळे पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना रोखता येणार आहे. सध्या केवळ महसूल मंडळांच्या ठिकाणी हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहेत.परंतु यातील काही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. यामुळे हवामान केंद्र उभारत असताना पाच हजार अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे.
या हवामान केंद्रांचा शेतकऱ्यांना होणार उपयोग..
नुकसान भरपाईच्या वेळी विमा कंपन्या स्कायमेट कडून सर्व माहिती घेत असतात. आता ही व्यवस्था मंडळांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यास उशीर होईल. ग्रामपंचायत ठिकाणी हवामान केंद्राची उभारणी झाली तर तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती शेतकऱ्यांना लवकर मिळेल. तसेच त्यासोबतच शेतकऱ्यांना कृषी सल्ला विषयक माहिती देखील देण्यात येणार आहे.
Published on: 07 January 2022, 05:27 IST