दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा शेतीला पूरक आणि महत्त्वाचा व्यवसाय आहे. मागील काही वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये जर्सी आणि एक होल्स्टिन या दोन संकरित गाईंचा फार मोठा वाटा आहे.
या विदेशी गाई भारतात आणणे शक्य नसल्याने या दोन विदेशी जाती या त्यामुळे राज्यात संकरित प्रजनन आधारे त्यांचे संगोपन केले जात आहे. त्यामुळे दूध उत्पादनात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
विदेशी होल्स्टिन आणि जर्सी बैलांचे वीर्य गोळा करून ते कॉल्ड स्टोरेज मध्ये साठवून देशात आणले जाते. त्यानंतर ते देशी गाईंच्या कृत्रिम रेतन करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे भारतामध्ये देखील संकरित गाईंना पर्याय म्हणून दुधाचे उत्पादन वाढत आहे. देशी गाई आणि विदेशी गाई यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देशी गाई नीखाल्लेल्या चार याचे रूपांतर हे मांसातहोते संकरित गाईंचे दुधात रूपांतर होते.
होस्टिन गायची वैशिष्ट्ये
या गाई आकाराने मोठे असतात व त्यांचे वजन सहाशे किलोच्या आसपास असते. या गायी जास्त दूध देणाऱ्या गाई म्हणून ओळखल्या जातात. या गाईंची जास्त दूध उत्पादन असून देखील या गाईंना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. या गायी जास्त तापमान सहन करू शकत नाही. तिच्या दुधाचे फॅट आपल्याकडील गाईच्या तुलनेत कमी असते.ही गाय दररोज 25 ते 30 लिटरपर्यंत दूध देते. या गायीची किंमत 50 ते 60 हजार रुपये पर्यंत असते.
जर्सी गाई चा विचार केला तरीही रोगप्रतिकारक शक्ती च्या बाबतीत चांगले असते. ही गाय दररोज 12 ते 14 लिटर दूध देते. जर्सी गाय मध्यम आकाराच्या असतात तसेच त्यांचे कपाळलाल आणि रुंद असते.
या गाई भारतीय हवामानात सहज तग धरू शकतात. जर्सी गायचे वजन चारशे ते साडेचारशे किलो दरम्यान असते. संक्रात गाईंचा प्रजनन कालावधी हा केवळ 70 ते 80 दिवसांचा असतो. त्यामुळे दुधाचे उत्पादन अधिक मिळते.तसेच या व्यवसायात सातत्य असल्याने शेतकऱ्यांना देखील चांगला नफा मिळतो. संकरित गाईंची वासरे 18 ते 20 महिन्यात वयात येतात आणि पहिली गर्भधारणा केवळ बावीस महिन्यात होते. दूध व्यवसायासाठी या फायदेशीर ठरतात. दोन वासरा मधील अंतर फक्त 13 ते 15 महिन्याच्या असते.(संदर्भ-साम टीव्ही)
Published on: 01 January 2022, 09:21 IST