News

राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता येताच दोन महिन्यांच्या आत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. परंतु आजही तब्बल 63 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.

Updated on 05 October, 2021 1:30 PM IST

 राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता येताच दोन महिन्यांच्या आत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. परंतु आजही तब्बल 63 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 50 हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु ती हवेत विरली. महा विकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन होता 20 हजार 59 कोटी रुपये राज्य सरकारनेअदा केले मात्र आता पाचशे कोटी मुळेउर्वरित शेतकऱ्यांना या पिक कर्जमाफीचा लाभ अद्यापही मिळालेला नाही.

 विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला होता परंतु या अनुषंगाने लागलीच पिक  कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी नियमित व्याज भरत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50000 देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु आता दीड वर्षे उलटून देखील ना उर्वरित  शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळालीनाही. यामध्ये विशेष म्हणजे 63 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी केव्हा 500 कोटींची तरतूद नसल्याने ही माफी रखडलेली आहे.

 

 वर्षअखेरीस कर्जमाफी पूर्ण होईल?

 कर्जमाफीतील 500 कोटींची तरतूद न झाल्याने राज्यातील 63 हजार शेतकरी या पीक कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत.मात्र हा मुद्दा डिसेंबर अखेरीस निकाली काढला जाणार असून या शेतकऱ्यांना रब्बीसाठी पीक कर्ज देण्याचे सहकार विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. त्यामुळे दीड वर्षापूर्वी घोषणा करण्यात आलेल्या पीक कर्ज माफी ला डिसेंबर महिन्यात पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा आहे.

English Summary: maharashtra gov.debt forgiveness scheme adaquate due to 500 crore rupees
Published on: 05 October 2021, 01:30 IST