१. लालबाग राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
राज्यातील काही मंडळांचे गणपती देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यात एक अग्रगण्य असणारं नाव म्हणजे मुंबईमधील लालबागचा राजा. नवसाला पावणारा गणपती म्हणून अशी या लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळे राजभरातून लोक दर्शनासाठी येतात. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना जवळपास पंचवीस तास रांगेत थांबावे लागते. मात्र तुम्ही घरबसल्याही सोशल मिडियाच्या माध्यमातून लालबाग राजाचे दर्शन घेऊ शकतात. त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केलीय. आज गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. काल रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.
२. पुण्यात जल्लोषात गणपती विराजमान
आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालीय त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यात देखील गणेशोत्सवाचा मोठा जल्लोष आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देखील वाजत गाजत विराजमान झाला आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केलीय. याचबरोबर पुण्यातील मानाचे ५ गणपती देखील विराजमान झालेत. यासोबतच सार्वजनिक गणपतीसह घरगुती गणपतीचं देखील आनंदात विराजमान झालेत.
३. कोकणात पारंपरिक पद्धतीने गणरायाचं आगमन
गणेशोत्सव म्हणजे कोकणातील चाकरमान्यांचा आनंदाचा उत्सव. या सर्वात मोठ्या उत्सवाला कोकणात आजपासून सुरुवात झालीय. या भागातील नागरिक गणपती पारंपारिक पद्धतीने डोक्यावर घेऊन येतात. तसंच कुटुंबातील सारेच एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात. रत्नागिरीत १ लाख ६६ हजार घरगुती गणपतीची आज प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीय. तसेच १२६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती विराजमान केलेत. त्यामुळे कोकणात आनंदाचे वातावरण आहे. ढोल ताशांच्या गजरात गणपती विराजमान झालेत.
४. मराठवाड्यात गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत
मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील जल्लोषात गणपती विराजमान झाले आहेत. घरघुती गणपतींपासून सार्वजनिक मंडळाचे गणपती आज विराजमान झालेत. या पार्श्वभूमीवर कोणतंही विघ्न येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या काळात तब्बल २ हजार ७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
५. राजकीय नेते, अभिनेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान
राज्यात सर्वत्र जल्लोषात गणरायाचे आगमन झालं आहे. याचबरोबर राजकीय नेत्यांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. तसंच अभिनेते, अभिनेत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या राजकीय नेत्यांच्या घरी आनंदात गणपतीचं आगमन झालं आहे. तसंच शेतकऱ्यांनी देखील गणरायाचं घरी स्वागत केलं आहे.
Published on: 19 September 2023, 03:09 IST