News

तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, वीज टंचाईमुळे त्रस्त असलेले महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात शेती विकत घेत आहेत. यामुळे आता वादाची शक्यता आहे. सध्या यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Updated on 25 March, 2022 4:02 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. यामुळे शेतकरी आणि महावितरण यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. उरावर आता तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, वीज टंचाईमुळे त्रस्त असलेले महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात शेती विकत घेत आहेत. यामुळे आता वादाची शक्यता आहे. सध्या यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

महागड्या विजेमुळे उद्योजक कर्नाटकात जात आहेत, तर मराठी शेतकरी तेलंगणात येत आहेत. शेतीसाठी 24 तास वीज पुरवठ्याच्या दृष्टीने तेलंगणातील जमिनीत शेतकरी गुंतवणूक करत असल्याचे ते म्हणाले. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा होत आहे. हा वीजपुरवठा देखील टप्प्यात होत आहे. तसेच बिल भरले नाही, म्हणून अनेकांची वीज तोडली जात आहे.

शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आठ तास दिली जाणारी वीज कधी दिवसा तर कधी रात्रपाळीला दिली जाते. महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे सरकार होते आणि आता काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. परंतू दोन्ही सरकार या भागातील शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करु शकले नाही. तेलंगणामध्ये ज्या योजना राबवल्या जात आहेत. त्या देशात इतरत्र कुठेही दिसू शकत नाहीत, असेही हरीश म्हणाले.

दरम्यान राज्यात अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देखील आली आहेत. अनेकांना वीज मिळत नाही, तर अनेकांची तोडली जात आहे. यामुळे यावरून राज्यात मोठा गोंधळ सुरू आहे. शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज मिळावी, अशी वेळोवेळी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील चांगलीच आक्रमक झाली होती.

सरकारने अनेक आश्वासने दिली आहेत. मात्र त्यावर पुढे काहीच होत नाही. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात आंदोलनही करण्यात आलं. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारकडून त्यांना मिळाले आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झाला आहे. दुसरीकडे राज्यात अन्यायी वीज बिलाची वसुली सुरु होती. सध्या ती थांबवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या;
'Sharad Pawar: लोकांना अजूनही मी शेती खात्याचा मंत्री असल्यासारखे वाटते, पण मी मंत्री नाही'
यावर्षी ऊस? नको रे बाबा, ऊस घालवता घालवता शेतकऱ्यांना आले नाकीन
Onion Market; शेतकऱ्यांनो तुम्ही साठवून ठेवा आणि ग्राहकांनो तुम्ही आता खरेदी करा, कांद्याच्या दरात मोठी घट

English Summary: Maharashtra farmers buy agriculture in Telangana as there is 24 hours electricity for agriculture
Published on: 25 March 2022, 04:02 IST