News

मुंबई: महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज (14 जुलै) बैठक झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated on 14 July, 2022 2:53 PM IST

मुंबई: महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज (14 जुलै) बैठक झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिंदे सरकारचे धडाकेबाज नऊ मोठे निर्णय

1. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय

2. राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान" राबवण्यात येणार (नगर विकास विभाग)

3. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबवणार

4. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार

हे ही वाचा: Breaking : पेट्रोल, डिझेल 'इतक्या' रुपयांनी झाले स्वस्त; शिंदे सरकारची मोठी घोषणा

5. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा (ग्रामविकास विभाग)

6. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार

7. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा.

8. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा

9. आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची (दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली) योजना पुन्हा सुरु करणार

हे ही वाचा: सरकारची 'ही' योजना तुम्हाला माहिती आहे का? फक्त 1 रुपया गुंतवा आणि मिळवा 15 लाख; जाणून घ्या योजनेबद्दल...

English Summary: Maharashtra Cabinet Decision: Farmers to Petrol; Read nine big decisions of Shinde government
Published on: 14 July 2022, 02:53 IST