महाराष्ट्रात आघाडी सरकारमध्ये शिवसेन्याच्या कोट्यातून सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले मालेगाव बाह्यचे प्रतिनिधित्व करणारे नामदार दादाजी भुसे ह्यांनी शेती आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री संदर्भात नुकताच एक महत्वाचा संकेत दिला. महाराष्ट्र सरकारात माननीय भुसे राज्याचे कृषी मंत्री ह्या नात्याने काम बघत आहेत. त्यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी बोलताना फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री महाराष्ट्रात वाढवले जातील तसेच शेती संबंधित उद्योगामध्ये महाराष्ट्र एक ब्रँड बनवला जाईल ह्यावर जोर दिला.
ह्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला मोबदला मिळेल अशी आशा देखील ह्यावेळी भुसे ह्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगांच्या विकासाला गती देण्याचे सरकारचे धोरण आहे आणि ह्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नरत असल्याचे भुसे ह्यांनी म्हटले. तसेच किमतीची साखळी विकसित करण्यास प्राधान्य देण्याविषयी आणि कृषी मालाला भाव मिळण्यासाठी मार्केटिंग आराखडा तयार करण्याविषयी देखील मंत्री महोदय बोलले. ह्यावेळी ते, मंत्रालयातील कृषी आणि अन्न प्रक्रिया संचालनालयाच्या कामांचा आढावा घेत होते.
यावेळी नामदार भुसे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेती आणि अन्न प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे, विभागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे महत्त्व ओळखून अशा प्रकारे काम करणे अपेक्षित आहे की या क्षेत्रात राज्याची नवी ओळख निर्माण होईल.
ते म्हणाले की, बचत गट, शेतकरी, सरकार, विशेषत: उद्योगात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे.
कृषी मंत्री पुढे म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी योजना कृषी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजना, मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, एकात्मिक फलोत्पादन विकास मिशन, महाराष्ट्र कृषी व्यवसाय नेटवर्क आणि पंतप्रधान किसान संपदा योजनेद्वारे लाभ दिले जात आहेत.
मंत्री महोदय ह्यांनी आपल्या सरकारचे कामाचे बखान केले आणि सोबतच आपल्या हटके स्टाईल मध्ये केंद्र सरकारवर टिका्सर देखील सोडले आणि एकत्र काम करण्याची गरज आहे आणि तसे होईल अशी आशा व्यक्त केली.
Source Tv9 Bharatvarsh
Published on: 18 October 2021, 04:43 IST