सातवा वेतन आयोग आणि दहा , वीस व तीस वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचार्यांचे काही दिवसापासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या मुळे महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर मंगळवारी या आंदोलन मागे घेण्यात आले आहे हि एक आनंदाची गोष्ट आहे . यासंबंधीच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी दिवाळीनंतर बैठक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सदर मागण्यांसाठी कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यावर मंगळवारी कृषी मंत्री दादा भुसे व त्यांचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासह खासदार विनायक राऊत, राजन विचारे, योगेश कदम, आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉक्टर चिंतामणी देवकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी.
यांच्यासोबत समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल नाईक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. संजय कोकाटे व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांच्या सकाळी प्रतिनिधी उपस्थित होते. सदर मागण्यांच्या संदर्भात कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचे जाहीर करण्यात आले.
Published on: 11 November 2020, 03:23 IST