महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी योजना शिवाजी महाराज सन्मान योजना अंतर्गत शेतकरी कर्जमाफी च्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 122 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. त्यातील शंभर कोटींचे पीक कर्ज एक आठवड्यात तातडीने वितरित करावे तसेच दाखल पीक कर्जाची प्रकरणे तात्काळ निकाली लावण्याचे निर्देश राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिले.
मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी झालेल्या सर्व बँका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दादासाहेब भुसे यांनी आढावा घेतला. मालेगाव तालुक्यातील जवळ-जवळ 13858 शेतकऱ्यांचे 122 कोटींचे कर्जमाफीच्या अनुदान जिल्हा बँकेकडे वर्ग झाले होते, मात्र एकूण संख्या मधून 8920 शेतकऱ्यांना शेचाळीस कोटी 45 लाखांचे पीक कर्ज वितरीत झाले. हे खेदजनक असल्याचे नमूद करत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा :पुढच्या महिन्यात मोदी सरकार लाभार्थीना 2000 रुपये देणार , लिस्ट मध्ये नाव असे चेक करा
पीक कर्जाच्या पोटी किंमत शंभर कोटीची रक्कम वाटप करण्याचे तातडीचे निर्देश त्यांनी व्यवस्थापकीय संचालक पिंगळे यांना दिले. पुढे त्यांनी निर्देश देताना म्हटले की, पात्र लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची छाननी किंवा पूर्तताही एकाच वेळेस करून घ्या त्यांना वारंवार बँके बोलू नका, दाखल झालेल्या प्रकरणांचा तात्काळ संस्करण करून निपटारा करण्याचे आदेश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची दाखल प्रकरणे विहित मुदतीत मंजूर करण्याचे तसेच महिला बचत गटांना पतपुरवठा करावा असे ते म्हणाले. झालेल्या बैठकीत उपमहापौर निलेश आहेर, नाशिक जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस एन पिंगळे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Published on: 25 November 2020, 07:55 IST