News

महाराष्ट्रामध्ये शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार आल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जात आहे. मग ते शेती क्षेत्राशी संबंधीत असो किंवा इतर क्षेत्रांशी परंतु निर्णय घेण्याचा धडाकाच या सरकारने लावलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

Updated on 05 October, 2022 4:16 PM IST

महाराष्ट्रामध्ये शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार आल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जात आहे. मग ते शेती क्षेत्राशी संबंधीत असो किंवा इतर क्षेत्रांशी परंतु निर्णय घेण्याचा धडाकाच या सरकारने लावलेला दिसतो. या पार्श्‍वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील भंडारा,  उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी देखिल काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. नेमके कोणते निर्णय या जिल्ह्यांच्या बाबतीत घेण्यात आले? याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:शिंदे सरकार रेशन कार्ड धारकांची दिवाळी करणार गोड! फक्त 100 रुपयात मिळणार या वस्तू

 उस्मानाबाद बीड या दुष्काळी जिल्ह्यांसाठी विशेष निर्णय

 यामध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी 11 हजार 736 कोटी 91 लाख रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प उस्मानाबाद आणि बीड या दुष्काळी जिल्ह्यांसाठी संजीवनी ठरणार आहे.

तसेच या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांमधील अवर्षण प्रवण क्षेत्रातील जवळ जवळ 133 गावातील एक लाख 14 हजार हेक्‍टर क्षेत्राला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. जर आपण कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा विचार केला

तर हा प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळ औरंगाबाद अंतर्गत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याच्या भागात प्रस्तावित असून यामध्ये प्राथमिक टप्प्यात सात दशलक्ष घनफूट व दुसऱ्या टप्प्यात 16.66 दशलक्ष घनफूट असे एकूण 23.66 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर आहे.

नक्की वाचा:बारामतीत पवारांना रोखण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आखली रणनीती

या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, कळंब, लोहारा, तुळजापूर, वाशिम,भूम आणि उमरगा या तालुक्यांना लाभ होणार असून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देखील या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.

 भंडारा जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय

 भंडारा जिल्ह्यात असलेला सुरेवाडा उपसा जलसिंचन योजनेचे गती देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाच्या 336 कोटी 22 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सुरेवाडा उपसा जलसिंचन योजनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील एक व इतर 28 गावातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सुरेवाडा उपसा जलसिंचन प्रकल्प हा सुरेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर बांधण्यात येत आहे.

नक्की वाचा:Cotton Update: शेतकरी बंधूंनो! कापसाचे विक्रीची योग्य नियोजनच शेतकऱ्यांसाठी ठरेल यावर्षी फायद्याचे, वाचा डिटेल्स

English Summary: maharahstra goverment took some important decision for bhandara,osmanabaad district
Published on: 05 October 2022, 04:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)